
नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडला. महायुतीचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी होणे अपेक्षित असताना 17 उमेदवारच विजयी झाले. नरेंद्र दराडे यांना अपेक्षित नसणारा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले गेले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यासाठी खास विमान पाठवून त्यांना मुंबईला बोलावल्याची बातमी आली. त्यामुळे नाशिकमध्ये वेगळाच “पॉलिटिकल ट्विस्ट” आला.
– तब्बल 218 मते फुटली
पण तरीसुद्धा नरेंद्र दराडे यांचा पराभव काही साधासुधा राहिला नाही. महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला. इतरत्र महायुतीचे सगळे गणित बरोबर आले. त्यांची आकडेवारी सगळीकडे बरोबर जुळली, पण नाशिक मध्ये मात्र महायुतीचे समीकरण बिघडून गेले. नाशिक मध्ये तब्बल २१८ मध्ये फुटल्याचे उघड झाले.
– महायुतीच्या बळाचे आकडे
नाशिक मधल्या लोकप्रतिनिधींचे एकूण बळ लक्षात घेता महायुतीकडे प्रचंड ताकद होती. त्यामध्ये भाजप 188, शिवसेना 171 तर अजित पवारांचे राष्ट्रवादी 107 अशी मते होती. महाविकास आघाडीकडे नगण्य मते होती. त्यामुळे महायुतीने दिलेले उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होणे शक्यच नव्हते. तरीसुद्धा त्यांचा पराभव झाला कारण महायुतीतील तब्बल २१८ मध्ये फुटली. यात प्रामुख्याने भाजपची मते फुटली असली तरी नरेंद्र दराडे यांच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा हात लागला. मूळात नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यातले येवल्यातले राजकीय वैर त्याला कारणीभूत ठरले. नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते या लढतीमध्ये राष्ट्रवादीतल्या संभाव्य मतफुटीची चर्चाच कुणी केली नव्हती. कारण नरेंद्र दराडे यांचा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या मतांच्या बळावर सहज विजय मिळविण्याचा होरा होता. पण फुटलेल्या एकूण मतांची संख्या लक्षात घेता नरेंद्र दराडे यांना भाजप आणि शिवसेना यांच्या मतांचे बळ पुरेसे ठरू शकले नाही. तब्बल २१८ मध्ये फुटली याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी सुद्धा नरेंद्र दराडे यांच्या विरोधात मते टाकल्याचे स्पष्ट झाले.
– गद्दारीचा आरोप आणि आकड्याचे वास्तव
नरेंद्र दराडे यांनी आपल्या पराभवाचे खापर भाजपचे मंत्री गिरीश महाजनांवर फोडले आणि बाकीच्या महायुतीतल्या नेत्यांवर फोडले. फक्त एकनाथ शिंदेंनी आपल्याला मदत केली, पण महायुतीतल्या बाकीच्या नेत्यांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला. यात त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याचे नाव घेतले नाही, पण म्हणून राष्ट्रवादीतली मते फुटल्याचे वास्तव लपून राहिले नाही.
The NCP, along with the BJP, played a role in Narendra Darade’s defeat.
महत्वाच्या बातम्या
- NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!
- कोलकाता हत्याकांडाचा पुसला कलंक; सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून केले गोपाल मुखर्जी रोड!!
- NEET exam : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्ली विमानतळावरच वेटिंग!!
- MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई



Post Your Comment