Trending News

No trending news found.

Monday, 22 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नाशिक मध्ये महायुतीत मिठाचा खडा; विजयी उमेदवार गोकूळ गीतेंवर माफी मागायची वेळ!!; पण शिवसेनेत प्रवेश करायचा ट्विस्ट!!

विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळे महायुतीत खळबळ माजली आहे. या निकालानंतर गोकुळ गीते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. पण आजच्या विजयानंतर त्यांना चक्क माफी मागावी लागली. पण त्याच वेळी त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाचा ट्विस्टही समोर आला. Gokul Gite

गोकूळ गीते म्हणाले :

– 6 वर्षांचं या मतदारसंघाच्या आमदराकीचं टेन्युअर आहे. आणि अशा कालावधीमध्ये एक “फिट” उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तर तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि “अनफिट” उमेदवार त्यांनी नाकारला. मी माझा प्रचार थांबविला होता. एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलो होतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतश: आभारी आहे.



विश्वासघाताचा आरोप

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीच्या नरेंद्र दराडे यांनी जाहीर संताप व्यक्त केला होता. माझा विश्वासघात झाला आहे, सगळे नेते खोटारडे आहेत, सगळे सारखेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र त्यांच्या या बोलण्यावर गोकुळ गीते यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचं उत्तर तेच देतील, अस म्हणत एका वाक्यात त्यांनी विषय संपवला.

शिंदेना भेटायला जाणार का??

दरम्यान, नाशिकचा धक्कादायक निकाल आल्यानंतर शिंदे गटाकडून गोकुळ गीते यांच्या विश्वासू सहकाऱ्याला पहिला फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गोकुळ गीते यांना याबद्दल, पुढल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, याबद्दल मला अजून काहीच माहिती नाही, असं गीते म्हणाले.

कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. हा विजय जरी गोकुळ गीतेंचा असला तरी या व्यक्तीमागे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे, असं म्हणत गीते यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही, यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

Friction within the Mahayuti in Nashik; winning candidate Gokul Gite faces a situation where he must apologize.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment