विशेष प्रतिनिधी
मुंबई : MP Nagesh Patil Ashtikar शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची टंचाई हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.MP Nagesh Patil Ashtikar
आपल्या बंडखोरीबाबत बोलताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, “मी आज आपल्यासमोर दोन तीन दिवसांच्यानंतर पहिल्यांदा पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. प्रथमत: मी सांगू इच्छितो की, नाराज वैगेर होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर मी मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिले, यात दुमत नाही. संजय राऊत किंवा मोठी मंडळी काही बोलत असतील, तर तो त्यांचा हक्क आहे. त्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यामुळे ते बोलतात. काही अडचणीचे नाही. ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते बोलले तर मला वाईट वाटणार नाही.MP Nagesh Patil Ashtikar
१८ जूननंतर अचानक काय घडले?
बंडखोरीच्या वेळेबाबत खुलासा करताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, “१८ जूनपर्यंत आमच्यापैकी कोणीही कुठेही गेले नव्हते. मात्र, त्यानंतर पक्षाकडून ज्या पद्धतीने बोलण्याचा अतिरेक झाला, त्यामुळे आता तिथे थांबून काही फायदा नाही, असा विचार बऱ्याच सहकाऱ्यांनी केला आणि हे पाऊल उचलले. कृपया कुणीही असंवैधानिक बोलू नका, राग व्यक्त करा पण असंवैधानिकपणे बोलू नका, शब्द मनाला खूप लागतात. कारण, आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी.”
५ कोटींच्या निधीत कामे कशी करायची?
सत्तेत सामील होण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना नागेश पाटील यांनी मतदारसंघातील अडचणी मांडल्या. ते म्हणाले, “सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची आणि जनतेची कामे होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मतदारांनी मला खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांची कामे करणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्याला विकासासाठी कुठलाही निधी मिळत नव्हता. केवळ खासदारांना मिळणारा ५ कोटींचा निधी गावोगावच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अतिशय अपुरा पडतो. प्रत्येक गावात गेल्यावर लोकांना विकासाची अपेक्षा असते. जर निधीच नसेल, तर मी लोकांची कामे कशी करू?”
शिवसेनेतेून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा सोडलेली नाही
आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना खासदार पाटील म्हणाले की, हे पाऊल कदाचित काहींना पटले असेल, तर काहींना पटले नसेल; शेवटी जनता जनार्दन आहे. “निवडणुकीपूर्वी मी जनतेला म्हणालो होतो की, मला तुमच्या सेवेसाठी ‘सालाने’ ठेवा, मी तुमचे साल नेकीने पार पाडेन. मी गेल्या दोन वर्षांपासून निष्ठेने काम करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन. मतदारसंघाचा विकास आणि निधी आणण्यासाठीच मला सत्तेत जाणे क्रमप्राप्त होते. माझ्यावर जनतेने टाकलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. मी माझ्या कामातून नाराज कार्यकर्त्यांना दाखवून देईल, मी दुसरे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतेून शिवसेनेतच गेलोय, मी विचारधारा सोडलेली नाही.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Not Angry With Uddhav Saheb”: MP Nagesh Patil Ashtikar on Joining Shinde Faction
महत्वाच्या बातम्या
- NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!
- कोलकाता हत्याकांडाचा पुसला कलंक; सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून केले गोपाल मुखर्जी रोड!!
- NEET exam : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्ली विमानतळावरच वेटिंग!!
- MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई



Post Your Comment