Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

NCPI : ना शिंदे “प्रयोग”, ना अजितदादांचा “खेळ”, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांचा केला वेगळाच “डाव”!!

ना शिंदे प्रयोग, ना अजितदादांचा खेळ, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा केला वेगळाच "डाव"!!, हे राजकीय सत्य कालच्या आणि आजच्या तृणमूळ काँग्रेसच्या 20 खासदारांच्या राजकीय खेळीतून समोर आले.

NCPI : ना शिंदे प्रयोग, ना अजितदादांचा खेळ, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा केला वेगळाच “डाव”!!, हे राजकीय सत्य कालच्या आणि आजच्या तृणमूळ काँग्रेसच्या 20 खासदारांच्या राजकीय खेळीतून समोर आले.

तृणमूळ काँग्रेसच्या 20 खासदारांनी ममता बॅनर्जी यांच्या मूळ तृणमूळ काँग्रेस पक्षा विरोधात बंड करून स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला, पण पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी एक वेगळीच राजकीय खेळी करून तो 20 खासदारांचा स्वतंत्र गट त्रिपुरातल्या एका मान्यता प्राप्त पक्षात म्हणजेच नॅशनॅलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन करून टाकला. त्यामुळे नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे लोकसभेत एकदम 20 खासदार झाले आणि त्यांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला.

– शिंदे – पवार कायदेशीर लढाईत अडकले

तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांना मदत करताना भाजपने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा अगदी भाऊ तोरसेकर म्हणाले स्वाती मालीवाल यांच्यासारखे कुठलेच “प्रयोग” केले नाहीत, तर त्यापेक्षा वेगळाच राजकीय “प्रयोग” भाजपने तृणमूळ काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांसाठी घडवून आणला. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर मूळ पक्ष आपला असल्याचा दावा केल्यामुळे ते कायदेशीर लढाईत अडकले. ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत खेचली गेली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष अजूनही बंडखोरांच्या म्हणजेच शिंदे किंवा सुनेत्रा पवारांच्या ताब्यात आल्याचे कायदेशीरदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. भाजपने तृणमूळच्या २० बंडखोर खासदारांना स्वाती मालीवाल्यासारखा “प्रयोग” सुद्धा करायला लावला नाही. पक्षातच राहून पक्ष नेतृत्वाविरुद्ध सतत बोलत राहा आणि कारवाई ओढवून घ्या, असला प्रकार २० खासदारांच्या बाबतीत त्रासदायक ठरला असता. तो सुद्धा भाजपने तृणमूळ काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या बाबतीत टाळला. त्या ऐवजी भाजपने तृणमूळ काँग्रेसच्या बंडखोर खासदारांना कोणालाच माहिती नसलेल्या पण निवडणूक आयोगाची अधिकृत असलेल्या नॅशनॅलिस्ट सिटीजनस पार्टी ऑफ इंडिया (NCPI)
नावाच्या पक्षात विलीन व्हायला सांगितले. त्यामुळे तृणमूळ काँग्रेसच्या बंडखोर 20 खासदारांची कायदेशीर लढाई करण्याची कटकट टळली आणि भाजपचेही पाठिंब्याचे काम झाले.



– चंद्राबाबू – शिंदे यांचे उपद्रव मूल्य घटले

त्याचबरोबर नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देणारा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. कारण या पक्षाचे 20 खासदार लोकसभेत आहेत तर त्यांच्या पाठोपाठ आता चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशांचे १६ खासदार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. नॅशनल सिटीजन पार्टीच्या 20 खासदारांच्या पाठिंब्याच्या बळावर भाजपने चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांना वेगळ्या प्रकारे काटशह दिला. “नंबर गेम” मधली त्यांची “न्यूसन्स व्हॅल्यू” कमी केली. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची नंबर गेम मध्ये “न्यूसन्स व्हॅल्यू” नव्हतीच, कारण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त सुनील तटकरे हे एकमेव खासदार लोकसभेत आहेत.

– अरुणाचल मधला जुना “प्रयोग” नव्याने!!

पण त्याही पलीकडे जाऊन दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने भाजपने तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना अरुणाचल प्रदेशामधला एक “जुना प्रयोग” नव्याने करायला लावल्याचे दिसले. अरुणाचल प्रदेशात भाजपने पेमा खंडू यांचे सरकार येण्यापूर्वी काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष फोडला होता. तो अख्खा विधिमंडळ पक्ष म्हणजे सगळे आमदार अरुणाचल प्रदेश मधल्या एका स्थानिक पक्षात विलीन करायला लावले होते. त्यामुळे काँग्रेसची सत्ता जाऊन अरुणाचल प्रदेश मध्ये स्थानिक पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. काही विशिष्ट कालावधी नंतर भाजपने अरुणाचल प्रदेश मधला स्थानिक सत्ताधारी पक्ष संपूर्णपणे आपल्यात विलीन करून घेतला. त्यामुळे एक मोठी कायदेशीर लढाई टळली होती. भाजपने काँग्रेस फोडली. काँग्रेसच्या आमदारांवरची पक्षांतर बंदी कारवाई टाळली. त्यांना प्रादेशिक पक्षात विलीन करून त्या सगळ्या आमदारांची आमदारकी वाचवली. नंतर तो प्रादेशिक पक्ष भाजपमध्ये विलीन करून घेतला. त्यामुळे अरुणाचल प्रदेश मध्ये पूर्णपणे भाजपची सत्ता आली. आज तेच पेमा खंडू भाजपचे मुख्यमंत्री म्हणून अरुणाचलमध्ये राज्य करत आहेत.

– भाजपने खुले ठेवलेत पर्याय

भविष्यात तृणमूळ काँग्रेसचे बंडखोर खासदार मूळच्या तृणमूळ काँग्रेस पक्षावर दावा सांगू शकतील किंवा ते नॅशनल सिटीजन पार्टी नंतर भाजपमध्ये विलीन करू शकतील, हे दोन्ही पर्याय भाजपने दीर्घकालीन राजकारणासाठी खुले ठेवलेत.

– वेगवेगळे डाव

या प्रयोगातून भाजपने एकाच वेळी वेगवेगळे “डाव” साधून घेतले. भाजपने हचंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्या संसदीय पक्षांपेक्षा NCPI नावाचा मोठा संसदीय पक्ष तयार केला. त्या पक्षाला 20 खासदार मिळवून दिले. त्या मोठ्या संसदीय पक्षाला कायदेशीर लढाईच्या कटकटीतून वाचविले. भविष्यात तो मोठा संसदीय पक्ष म्हणजेच NCPI चे २० खासदार भाजपमध्ये पूर्णपणे विलीन करून घ्यायची राजकीय बेगमी करून ठेवली.

Merged with the Nationalist Citizens Party and will work with the NDA

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment