Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Nana Patole : सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी' या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून टाकल्याचा गंभीर आरोप पटोले पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारातून भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अक्षरशः गळा घोटला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Nana Patole ‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून टाकल्याचा गंभीर आरोप पटोले पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारातून भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अक्षरशः गळा घोटला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.Nana Patole

नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि मॅच फिक्सिंग हे भाजपच्या बाजूने करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गटबाजी करण्यात आली. ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमधील पराभवाच्या छायेखाली असलेल्या भाजप सरकारने ईव्हीएम मशीन्स जाळून टाकल्याचा दावाही पटोले यांनी केला आहे. तसेच हा घातपात मुद्दाम घडवून आणला गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Nana Patole



सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावर टीका

भाजपच्या 2014 ते 2019 या काळातील तत्कालीन फडणवीस सरकारने 2016 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. राज्यात सरकार बदलूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप पूर्ण झालेली नाही, असे सांगत त्यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांवर जाचक अटी लादल्या जात असून, ‘आधी ठराविक रक्कम भरा, तरच कर्जमाफी होईल’ अशी सक्ती केली जात आहे. यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी मिळण्याऐवजी शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढले जात असून, बँकांचे कर्ज कुठेही माफ होताना दिसत नाही, ही अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांच्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारण्यात आलेल्या या उपोषणाला काँग्रेस पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.

EVM Machines Burned as Case Reached Supreme Court: Nana Patole Slams Modi Govt

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment