Trending News

No trending news found.

Monday, 18 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना मिळणार विकासाची नवी झळाळी; भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वराचा समावेश!!

महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.Maharashtra will get a new wave of development; Bhimashankar, Parli Vaijnath, Ghrishneshwar included!!



✅ श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आदर्श गाव प्रकल्प विकास आराखडा
✅ श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखडा
✅ श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा, वेरुळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर
✅ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू जि. पुणे येथील सर्वांगीण संवर्धन व विकास उपक्रम
✅ सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा जतन, संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा विकास
✅ महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संगम माहुली, सातारा येथील समाधी स्थळांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि परिसर विकास कामे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्ते संदर्भात सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra will get a new wave of development; Bhimashankar, Parli Vaijnath, Ghrishneshwar included!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment