Trending News

No trending news found.

Monday, 18 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

केरळमध्ये काँग्रेसचे मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट”; 22 आमदारांपैकी 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल!!

केरळ मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीच्या पराभव करून तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळविल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आज शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसने मुस्लिम लीगला "धर्मनिरपेक्षतेचे" "सर्टिफिकेट" देऊन तब्बल 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केली.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : केरळ मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीच्या पराभव करून तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळविल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आज शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसने मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” देऊन तब्बल 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केली.

– कट्टर इस्लामी संघटना फोफावल्या

केरळ मध्ये पीएफआय आणि एसडीपीआय यांच्यासारख्या कट्टर इस्लामी संघटना आधीच प्रचंड फोफावल्या असताना काँग्रेसने मुस्लिम लीग सारख्या पक्षाला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” देऊन त्या पक्षाच्या 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केल्याने काँग्रेस राजवटीची पुढची वाटचाल जिहादी इस्लामी वळणाकडे गेल्याचेच स्पष्ट झाले.

– मुस्लिम लीगला सत्तेत मोठा वाटा

केरळ मध्ये काँग्रेसने आणि कम्युनिस्टांनी नेहमीच इस्लामी जिहाद संघटनांना पाठीशी घातले होते. कम्युनिस्टांच्या राजवटीमध्येच पीएफआय आणि एसडीपीआय यांच्यासारख्या कट्टर इस्लामी संघटना राज्यात प्रचंड फोफावल्या. त्यांनी उत्तर केरळ भागात दहशत माजवली. मुस्लिम लीगने त्याचाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ घेतला. केरळ मध्ये काँग्रेसने मुस्लिम लीग बरोबर समझोता करून निवडणुका लढविल्या. त्यामध्ये काँग्रेसला 63 आमदार निवडून आणता आले. पण मुस्लिम लीगचे तब्बल 22 आमदार निवडून आले. मुस्लिम लीग सारखा पक्ष दोन नंबरचा पक्ष बनला. त्यांच्या सत्तेमध्ये मोठा वाटा निर्माण झाला. त्यामुळे काँग्रेसला मुस्लिम लीग करता “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” द्यावे लागले. त्यांच्या एक-दोन किंवा दोन-तीन नव्हे, तर तब्बल पाच मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करावे लागले.

– मुस्लिम लीगने धर्मनिरपेक्षता स्वीकारल्याचे “सर्टिफिकेट”

केरळमध्ये मुस्लिम लीगचे अस्तित्व पूर्वीपासूनच होते, पण दोन-तीन मंत्री वगळता त्यांना सत्तेमध्ये पूर्वी कधी स्थान नव्हते. पण 2026 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने कम्युनिस्टांचा पराभव करण्यासाठी मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली‌. त्या पक्षाला प्रमाण बाहेर वाढ करण्याची संधी दिली. मुस्लिम लीगने काँग्रेस बरोबर झालेल्या युतीचा मोठा लाभ उठविला. मुस्लिम लीगचे 22 आमदार निवडून आणले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आल्यानंतर व्ही. डी. सतीशन यांनी मुस्लिम लीगच्या नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. मुस्लिम लीगने धर्मनिरपेक्ष भूमिका स्वीकारल्याचे “सर्टिफिकेट” त्यांना दिले. मुस्लिम लीगच्या आशीर्वादानेच आपले सरकार बनत असल्याचे सांगितले. त्या पाठोपाठ आज त्यांनी मुस्लिम लीगचे आमदार पी. के. कुन्हीलकुट्टी, पी. के. बशीर, व्ही. इ. अब्दुल गफूर, के. एम. शाजी आणि एन. शमसुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. या शपथविधी समारंभाला स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसशासित राज्यांचे सगळे मुख्यमंत्री हजर होते. त्यामुळे मुस्लिम लीगच्या “धर्मनिरपेक्षतेवर” वरूनच “शिक्कामोर्तब” झाले.

In Kerala, Congress Issues a “Certificate” of “Secularism” to the Muslim League.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment