Trending News

No trending news found.

Friday, 19 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. "ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते," असा दावा त्यांनी केला.

विशेष प्रतिनिधी

वाशिम : Bachchu Kadu  ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.Bachchu Kadu

दरम्यान, बंडखोर सहा खासदार उद्या एकनाथ शिंदे यांच्या मंचावर दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चार खासदार अजूनही राजस्थानमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अधिकृत राजकीय घोषणा थोडी पुढे ढकलली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.Bachchu Kadu



‘शिंदेंची रणनीती अजून संपलेली नाही’

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “ठाकरे गटाचे खासदार बाहेर पडले, त्यानंतर आता काही आमदारही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे येऊ शकतात. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “राज्यातील सर्वसामान्य, शेतकरी, दिव्यांग आणि गरीब लोकांमध्ये शिंदे यांची प्रतिमा सेवाभावी नेत्याची आहे. मी जसा त्यांच्या कामामुळे प्रभावित झालो, तसे अनेक लोक त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत.”

उद्याच्या कार्यक्रमात बंडखोर खासदार दिसणार नाहीत?

सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी उद्या होणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यक्रमात हे सहा खासदार उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यातील चार खासदार राजस्थानमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अधिकृत प्रवेश किंवा शक्तिप्रदर्शनाची घोषणा नंतरच्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा खासदारांचा पक्ष ठरणार?

ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र दिल्याचा दावा केला जात आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण झाली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 7 वरून थेट 13 वर जाईल.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून लोकसभेत सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिंदे गटाची शिवसेना पुढे येईल. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) शिंदे यांचे राजकीय वजन आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत बंडखोर खासदार?

ठाकरे गटातून वेगळी भूमिका घेतल्याचा दावा असलेल्या खासदारांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे:

संजय जाधव (परभणी)
संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)

ठाकरेंसोबत उरलेले तीन खासदार

अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई)
राजाभाऊ वाजे (नाशिक)

‘ऑपरेशन टायगर’नंतर राजकारण तापणार

2022 मध्ये 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. आता चार वर्षांनंतर लोकसभेतील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे, बच्चू कडू यांच्या विधानामुळे आता पुढचा टप्पा आमदारांपर्यंत पोहोचणार का, याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे – ‘ऑपरेशन टायगर’ इथेच थांबणार की पुढचा डाव आमदारांवर खेळला जाणार?’

MLAs Will Follow After MPs”: Bachchu Kadu’s Big Claim on Shiv Sena UBT Split

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment