वृत्तसंस्था
नवी दिल्ली : EPF Interest Rate देशातील 7 कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफवरील 8.25 टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी पीएफवरील व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.EPF Interest Rate
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच महिन्यात म्हणजे जूनअखेरपर्यंत व्याजाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.EPF Interest Rate
मार्चमध्ये झाला होता निर्णय
यापूर्वी 2 मार्च 2026 रोजी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.
सलग तिसऱ्या वर्षी व्याजदर कायम
ईपीएफओने सलग तिसऱ्या वर्षी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. 2023-24 मध्ये 8.15 टक्क्यांवरून व्याजदर वाढवून 8.25 टक्के करण्यात आला होता. त्यानंतर 2024-25 आणि आता 2025-26 या दोन्ही वर्षांसाठीही तोच दर कायम ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांतील व्याजदरांचा प्रवास
मार्च 2022 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. हा दर 1977-78 नंतरचा सर्वात कमी दर मानला जातो. त्याआधी 2020-21 मध्ये व्याजदर 8.50 टक्के होता.
मागील दशकात सर्वाधिक 8.80 टक्के व्याज आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये देण्यात आले होते. 2013-14 आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के, तर 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याज मिळाले होते.
व्याज जमा होण्याची प्रक्रिया होणार अधिक वेगवान
ईपीएफओने विकसित केलेल्या नव्या डिजिटल प्रणालीमुळे यंदा व्याज जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. प्रक्रिया सुरू होताच सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम थेट जमा केली जाईल. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
लवकरच एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा
ईपीएफओच्या 3.0 उपक्रमांतर्गत सदस्यांसाठी आणखी मोठे बदल केले जाणार आहेत. लवकरच एटीएम आणि यूपीआयच्या माध्यमातून पीएफमधील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे सुमारे 7.8 कोटी सदस्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय आणि कार्यालयीन प्रक्रियेशिवाय त्वरित निधी मिळू शकणार आहे. तसेच ऑटो-क्लेम सेटलमेंट, थेट बँक खात्यात निधी हस्तांतरण आणि अधिक सुलभ डिजिटल सेवा यांसारख्या सुविधांचाही समावेश असणार आहे.
नोकरदार वर्गाला मोठा दिलासा
व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सरकारने 8.25 टक्के दर कायम ठेवल्याने लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई आणि वाढत्या खर्चाच्या काळात पीएफवरील स्थिर परतावा नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा आधार मानला जात आहे.
EPF Interest Rate Approved at 8.25% for FY 2025-26; Check Credit Update
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!
- China-Nepal : नेपाळ-चीनची वाढती जवळीक; भारतासाठी धोक्याची घंटा? हिमालयात बीजिंगचा प्रभाव का वाढतोय?
- India-UK Free : भारत-यूके मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून लागू; स्कॉच, कार, सौंदर्यप्रसाधने स्वस्त होणार
- PM Modi : जी-7 नंतर पॅरिसमध्ये मोदींचे जोरदार स्वागत; मॅक्रॉन यांच्यासोबत ‘विवाटेक 2026’मध्ये सहभाग



Post Your Comment