Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Navnath Ban : ‘राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करतायत’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, "राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत," असा आरोप केला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Navnath Ban  महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.Navnath Ban

नवनाथ बन यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आंदोलनांमध्ये तुम्ही कुठेच दिसला नाहीत. केवळ तोंडाने गोळाफेक करण्यापलीकडे तुमची कुवत नाही,” अशी टीका त्यांनी केली.Navnath Ban



‘फडणवीसांना प्रश्न विचारण्याआधी उद्धव ठाकरेंना विचारा’

नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव गट) आणि भाजपमधील जुन्या संघर्षांचाही उल्लेख केला. “देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना विचारा की, नारायण राणे आणि कंगना राणावत यांच्या मालमत्तांवर कारवाई कोणी केली होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी संजय राऊत यांच्या “ऑपरेशन टायगर” आणि “ऑपरेशन लांडगा” या वक्तव्यांवरही निशाणा साधला. “ही भाषा तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला ‘ऑपरेशन गिधाड’ची भाषा जास्त चांगली जमते. लोकांना लुटण्याचे काम तुम्ही केले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

‘उद्धव ठाकरेंकडे भगवा राहिला नाही’

राजकीय आघाड्यांच्या चर्चांवर बोलताना बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्याकडे आता भगवा झेंडा उरलेलाच नाही. त्यांनी भगवा सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांना हिरव्या झेंड्याची जास्त चिंता आहे.”

याउलट राज ठाकरे हिंदुत्ववादी विचारांचे असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले, “राज ठाकरे भगव्याच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे ते तुमच्या हिरव्या झेंड्याखाली एकत्र येतील, असे वाटत नाही.”

‘मनपा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला’

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर बोलताना नवनाथ बन यांनी जुना राजकीय इतिहास उकरून काढला.

“महापालिका निवडणुकांवेळी तुम्ही मनसेला सोबत घेतले आणि नंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्या युतीत मनसेच्या केवळ सहा जागा निवडून आल्या. ते स्वतंत्र लढले असते तर अधिक जागा मिळाल्या असत्या. तो अनुभव राज ठाकरे विसरलेले नसतील,” असे ते म्हणाले.

‘मराठी कामगार आता भाजपसोबत’

मुंबई विमानतळावरील मराठी कामगारांच्या प्रश्नावरूनही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

“कामगार सेनेच्या नावाखाली २५ वर्षे मराठी कामगारांची लूट करण्याचे काम झाले. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्या नेतृत्वाखाली मराठी कामगार आता एकवटला आहे,” असा दावा बन यांनी केला.

त्यांच्या मते, भाजप सत्तेत आल्यानंतर कामगारांना नियमित वेतन मिळू लागले असून त्यांची पिळवणूक थांबली आहे. “तुम्ही कितीही आंदोलन केले तरी आता काही फरक पडणार नाही, कारण मराठी माणूस भाजपसोबत आहे,” असे ते म्हणाले.

पत्राचाळ प्रकरणाचाही उल्लेख

नवनाथ बन यांनी आपल्या टीकेत पत्राचाळ प्रकरणाचाही संदर्भ दिला. “जेव्हा पत्राचाळ प्रकरण घडत होते, तेव्हा तुमचे आई-वडील मराठीच होते का?” असा उपरोधिक सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला.

तसेच, “भाजपचे नगरसेवक आणि नेते मराठी माणसांच्या पाठीशी उभे आहेत. आम्ही त्यांना मुंबईतच घरे देत आहोत. तुमच्यासारखे त्यांच्यावर मुंबई सोडण्याची वेळ आम्ही आणलेली नाही,” असा दावा त्यांनी केला.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे समीकरणांवर पुन्हा चर्चा

नवनाथ बन यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना आणखी रंग चढला आहे. एकीकडे विरोधी पक्ष भाजपविरोधी मतांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजपकडून या शक्यतेवर सतत टीका केली जात आहे.

पावसाळी अधिवेशन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

“Those Who Betrayed Raj Thackeray Talk of Unity”: Navnath Ban Attacks Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment