Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली.

– शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून दाखलही नाही!!

नाशिक : रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली. रोहित पवारांची शुगर कमी झाली असल्याची बातमी काल आली होती. पण डॉक्टरांनी त्यांच्यावर वेळीच उपचार केले. आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची त्यांच्याभोवती गर्दी झाली. पण महत्त्वाचे म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून रोहित पवारांच्या आंदोलनाची दखलही घेतली नसल्याचे दिसून आले.

– रोहित पवारांची बॉडी लँग्वेज

रोहित पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवर वेगवेगळी माहिती आणि फोटो शेअर केले. त्यातून त्यांची बॉडी लँग्वेज त्यानंतर उत्साहाची आणि आक्रमक दिसून आली. सलग तीन दिवसांच्या अन्नत्यागानंतर सुद्धा रोहित पवारांच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लॅंग्वेज मध्ये कुठली थकावट दिसली नाही. उलट त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सोशल मीडियावर क्रेझ असणारे युवा शेतकरी रविराज साबळे पाटील आदींशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि सलील देशमुख यांनी सुद्धा रोहित पवारांना भेटून त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.

त्याआधी संगम बेट वाळकी (ता. दौंड) येथील योगीराज श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नामदेव महाराज साठे आणि त्यांचे सहकारी कीर्तनकर रणजित महाराज शिंदे, सुरज महाराज जराड, रामदास महाराज गव्हाणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.यावेळी त्यांनी आणलेल्या सोहळ्यातील पादुकांचे रोहित पवारांनी दर्शन आणि आशीर्वाद घेतले.

पहाटे ५.३० वाजल्यापासूनच भेटून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांची, युवांची रीघ सुरुय. या वाढत्या जनसमर्थनापुढं सरकारला झुकावंच लागेल आणि कोणत्याही अटीशर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावीच लागेल, असे रोहित पवारांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिले.

– शरद पवारांकडून दाखल नाही

पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या सोशल मीडिया हँडलवरून रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतल्याचे दिसले नाही. शरद पवारांनी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन सोडून अन्य विषयांवर ट्विट केल्याचे दिसले. त्यामध्ये जागतिक रक्तदान दिन, रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा, आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांना अभिवादन, जागतिक बालकामगार विरोधी दिन आदी विषय हाताळलेले दिसले. पण शरद पवारांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आपल्या ट्विटर हँडल वरून कुठला उल्लेख केल्याचे दिसले नाही.

– सुप्रिया सुळेंचे सुद्धा दुर्लक्ष

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून सुद्धा व्ही सेल्वराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी जागतिक रक्तदान दिन, हर्षवर्धन देशमुख यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस, क्लाईड कॅस्ट्रो यांचा वाढदिवस, पियुष गोयल आणि आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस याविषयी शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान त्यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला. त्यांनी शरद पवारांची काही ट्विट री ट्विट केली. पण सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आपल्या ट्विटर हँडलवर उल्लेख सुद्धा केलेला दिसला नाही.

Today is the third day of Rohit Pawar’s fast.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment