
Assam Chief Minister आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी भारत – बांगलादेशी बॉर्डर वरची ऐतिहासिक चूक उलगडून दाखवली. राजीव गांधींच्या सरकारने 1985 मध्ये आसाम गण परिषदेबरोबर आसाम करार केला होता. पण त्यामध्ये एक अत्यंत गंभीर अशी चूक राहिली होती.Assam Chief Minister
या संदर्भात आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी परखड शब्दांमध्ये त्या चुकीची चिकित्सा केली.Assam Chief Minister
– हेमंत विश्वशर्मा म्हणाले :
– आसाम आणि बांगलादेश यांच्यात १६०० किलोमीटरची सीमा आहे. आसाम करार केला आणि त्यात म्हटले होते की आसाम-बांगलादेश सीमेवर कुंपण (fencing) घातले जावे; त्यानुसार कुंपणाचे कामही झाले. पण मेघालय, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्येही कुंपण घालण्याची गरज आहे, याचा त्यावेळी त्या सरकारने विचारच केला नाही. आमची मागणी पाचही राज्यांच्या सीमांवर कुंपण घालण्याची असायला हवी होती.
– १६०० किलोमीटरच्या सीमेपैकी त्रिपुरामध्ये कुंपणाचे काम सध्या सुरू आहे. यापूर्वी मेघालयमध्ये कुंपण नव्हते, पण आता ९० % काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ८०० किलोमीटरची सीमा तर खुलीच होती, जर सिलीगुडीचा भाग खुला असेल आणि मानकाचरचा भाग बंद असेल, तर त्याला काय अर्थ उरतो?? या ऐतिहासिक चुका होत्या. संपूर्ण १६०० किलोमीटरच्या सीमेवर कुंपण उभारण्याची मागणी आम्ही करायला हवी होती. आता मेघालयमध्ये ९० % आणि त्रिपुरामध्ये ६० % टक्के काम पूर्ण झाले आहे, मिझोराममध्ये काम सुरू आहे आणि आता बंगालमध्येही ते हाती घेण्यात आले आहे.
– १९८५ च्या कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०२५ पासून सुरू झाली आहे. आधीच्या चुकांमुळे आम्हाला बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखता आली नाही. केंद्र सरकारने लोकसंख्याशास्त्रीय बदलांबाबत (demography changes) एक समिती स्थापन केली आहे. मला वाटते की सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या संदर्भात केंद्र सरकार अधिक प्रभावी पावले उचलणार आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या नागरिकत्वाची पडताळणी केली जावी, अशी सूचना आमचे आसाम सरकार करेल.
– एकूण बॉर्डर किती??
मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी भारत आणि बांगलादेश दरम्यान कुंपण घालण्याच्या मुद्द्याची चिकित्सा केली. भारत आणि बांगलादेश दरम्यान तब्बल ४०९७ किलोमीटरची बॉर्डर आहे. पण ती सगळी लूज बॉर्डर ठेवल्यामुळे बांगलादेशींना भारतात घुसखोरी करायची कायमच संधी मिळत गेली. लूज बॉर्डर मुळे कोट्यावधी बांगलादेशी कायमचे भारतात येऊन वसले. त्यांना काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी भारताच्या नागरिकत्वाची कागदपत्रे मिळवून दिली. या घुसखोरांना काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी आपली मतपेढी बनवली.
पण आता भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या संपूर्ण बॉर्डरवर कुंपण घालायचे काम एकतर पूर्ण झाले आहे किंवा ते काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे बांगलादेशातून भारतात येणाऱ्या नवीन घुसखोरीला परिणामकारक अटकाव करणे शक्य होणार आहे.
Assam Chief Minister reveals a historic blunder regarding the India-Bangladesh border; read how infiltrators gained a free run.
महत्वाच्या बातम्या
- FSSAI : मैगीवर पुन्हा प्रश्नचिन्ह? कीडे आढळल्याच्या तक्रारीनंतर FSSAI ची नेस्लेला नोटीस; KFC आणि फ्लिपकार्टकडूनही मागवला खुलासा
- Donald Trump : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने नेतान्याहू चक्रावले? इराणबाबत अमेरिकेची नवी भूमिका; पश्चिम आशियात मोठ्या घडामोडी
- Elon Musk : इलॉन मस्क ठरले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; स्पेसएक्समुळे संपत्तीत विक्रमी झेप, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
- मोदींची तुलना नेहरूंबरोबर नकोच; पण पवारांची तुलना कुणाबरोबर करता येईल??



Post Your Comment