Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

शरद पवारांची उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळमध्ये पण फुटली; पवारांची मोदी स्तुती पक्षाला भोवली!!

शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.

नाशिक : शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.

केरळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कम्युनिस्टांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट मधून निवडणूक लढविली होती. पण तिथे त्यांच्या तीनही उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले. पवारांच्या राष्ट्रवादीला केरळमध्ये अतिशय नगण्य मते मिळाली. पवारांच्या राष्ट्रवादीत पी. सी. चाको यांच्या रूपाने एकमेव चेहरा असणारे नेते राजकीय अस्तित्व टिकवून होते. पण त्यांनी सुद्धा नंतर पक्षाला रामराम ठोकला.



– केरळ राष्ट्रवादीत बंडखोरी

त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उरलेल्या नेत्यांनी पक्ष सोडायला सुरुवात केली. त्यातूनच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केरळमध्ये बंडखोरी जास्त तीव्र झाली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नुकतीच स्तुती केली होती‌. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतले केरळ मधले नेते चिडले आणि त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली.

– पवार आणि सुळे धर्मनिरपेक्ष नाहीत

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते आत्तापर्यंत धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी होते पण शरद पवारांनी मोदींची अनेकदा स्तुती केली. महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. केरळ मधले आम्ही सगळे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी आहोत. पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीच लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही दोन्ही तत्वे सोडून दिली त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर राहणे कठीण आहे. आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावाच लागेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आता काही भवितव्य नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते जॉर्ज जे मॅथ्यू यांनी केले. 11 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र निर्णय होईल, असे सूतोवाच सुद्धा त्यांनी केले.

– नेत्यांनीच उघडा पाडला पवारांचा चेहरा

केरळ मधल्या या घटनेमुळे शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुठला धक्का बसला नाही. कारण केरळ किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना धक्का बसावा, एवढी त्यांच्या पक्षाची ताकद सुद्धा उरली नाही. पण शरद पवार धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी उरले नाहीत हे सत्य मात्र त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी सांगून पवारांचा खरा चेहरा सगळ्या देशासमोर आणला.

Sharad Pawar’s remaining NCP faction splits in Kerala too; Pawar’s praise of Modi leaves the party

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment