Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

एकीकडे राहुल गांधींनी दाखविली आर्थिक भूकंपाची भीती; दुसरीकडे काँग्रेसचा केरळमध्ये जाहीरनाम्यातून पैशाचा वर्षाव!!

एकीकडे राहुल गांधींनी दाखविली आर्थिक भूकंपाची भीती आणि दुसरीकडे काँग्रेसने केरळमध्ये जाहीरनाम्यातून केला पैशाचा वर्षाव!!, ही मोठी राजकीय विसंगती आज समोर आली.

नाशिक : एकीकडे राहुल गांधींनी दाखविली आर्थिक भूकंपाची भीती आणि दुसरीकडे काँग्रेसने केरळमध्ये जाहीरनाम्यातून केला पैशाचा वर्षाव!!, ही मोठी राजकीय विसंगती आज समोर आली. Rahul Gandhi

इराण आणि अमेरिका युद्धातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भारतात आर्थिक भूकंप होण्याची भीती दाखवली. केंद्रातले मोदी सरकार आणि केरळ मधले कम्युनिस्टांचे सरकार सामान्य जनतेला आर्थिक दिलासा देत नाही. त्यांना आर्थिक भूकंपापासून वाचवू शकत नाही. युद्धामुळे सगळ्या जगाचे नुकसान झाले, तेवढेच नुकसान भारताचे झाले, पण मोदी सरकारने आर्थिक भूकंपातून सावरण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. केरळ मधल्या कम्युनिस्ट सरकारने सुद्धा भाजप बरोबर छुपी आघाडी करून केरळ मधल्या जनतेला नागवून टाकले, असा आरोप राहुल गांधींनी केला.



– राहुल गांधींचा दावा

आखाती देशांमधल्या युद्धाच्या दुष्परिणामामुळे भारतात इंधन टंचाई झाली. इंधनाचे दर वाढले. त्यामुळे महागाई सुद्धा वाढली. प्रचंड महागाई आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारने कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळेच देशात लवकरच आर्थिक भूकंप होईल. कारण देशाची परकीय गंगाजळी खाली आली आहे. इंधना वरचा खर्च वाढत आहे. त्यामुळे देशाच्या तिजोरीत लवकरच खडखडाट होईल, असा दावा राहुल गांधींनी केला.

– पण केरळमध्ये पैशाचा वर्षाव

पण त्याचवेळी केरळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून जनतेवर पैशांचा वर्षाव केला. केरळ मध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर आली, तर महिलांना सरकारी बस मधून मोफत प्रवासाची सवलत देऊ, प्रत्येक कॉलेज विद्यार्थिनीला दर महिन्याला 1000 रुपये देऊ, ज्येष्ठ नागरिकाला दर महिन्याला 3000 रुपये देऊ, प्रत्येक रुग्णाला 25 लाख रुपयांचा ओमन चंडी आरोग्यविमा देऊ, मेड इन केरला वस्तू बनविण्यासाठी शून्य व्याजदराने कर्जपुरवठा करू, अशी एका चढ एक आश्वासने काँग्रेसने दिली. पण ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत, ते आणणार कुठून??, या विषयी काँग्रेसच्या नेत्यांनी चकार शब्द उच्चारला नाही. राहुल गांधींच्या भाकितानुसार देशात जर आर्थिक भूकंप होणार असेल आणि देशाची आर्थिक स्थिती आणखी डबघाईला जाणार असेल, तर काँग्रेसला तरी आश्वासने पूर्ण करण्यासाठी कुठून पैसा मिळणार??, या सवालाचे उत्तरही काँग्रेसच्या एकाही नेत्याने दिले नाही.

On one hand, Rahul Gandhi warned of an economic earthquake.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment