
नाशिक : झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ!!, असाच मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत मंडपम मध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना दिला, पण तो न बोलता आणि कृतीतून!!Long-serving PM: “Eat Jhalmuri, win the election” – Modi’s mantra to allies at Bharat Mandapam!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 10 जून 2026 रोजी पंडित नेहरूंचा सलग पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 43099 दिवस पंतप्रधान पदावर राहिले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या सर्व नेत्यांनी राजधानीतील भारत मंडपम मध्ये एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या 39 पक्षांचे प्रमुख नेते, भाजप आणि मित्रपक्ष शासित 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे हजर होते. या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वैशिष्ट्यपूर्ण वस्तू देऊन सत्कार केला. मोदींच्या विशेष अभिनंदनाचा ठराव मांडला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi shares Jhalmuri with fellow NDA leaders at the NDA meeting today at Delhi's Bharat Mandapam.
(Source: Narendra Modi/Instagram) pic.twitter.com/JbTckJSjGP
— ANI (@ANI) June 10, 2026
– झालमुरीने आणली बंगालच्या निवडणुकीत मजा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांचा सुद्धा सन्मान केला. पण त्याचवेळी या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले, ते म्हणजे झालमुरी नावाची बंगाल मधली भेळ!! या झालमुरी भेळीने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत फार मजा आणली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका छोट्या व्यावसायिकाच्या दुकानात जाऊन झालमुरी खाल्ली. त्यामुळे ही भेळ जगभरात फेमस झाली. पश्चिम बंगाल मधल्या भाजपच्या विजयाची ती प्रतीक ठरली.
– मुख्यमंत्र्यांनीच दिली मोदींना झालमुरी
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भारत मंडपम मध्ये झालमुरी भेळीचा स्टॉल मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या सगळ्या नेत्यांसह या स्टॉलवर पोहोचले. त्यावेळी स्वतः सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या हाताने झालमुरी भेळ बनवून मोदींना दिली. त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व नेत्यांनाही झालमुरी भेळीच्या प्लेटी दिल्या. मोदींनी सगळ्यांबरोबर झालमुरी भेळीचा आस्वाद घेतला. त्यांनी या कृती मधूनच झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ!!, असा संदेश आपल्या मित्र पक्षांना दिला. बंगालची झारमुरी विधानसभा निवडणुकीत तर गाजलीच, पण भारत मंडपम मध्ये सुद्धा सजली!!
Long-serving PM: “Eat Jhalmuri, win the election” – Modi’s mantra to allies at Bharat Mandapam!
महत्वाच्या बातम्या
- जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!
- Iran : इराणमध्ये आता भाकरीही हप्त्यांवर! अमेरिका-इराण संघर्ष, महागाई आणि निर्बंधांनी जनतेचे कंबरडे मोडले
- पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!
- Vizag Steel Plant : विझाग स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा होरपळून मृत्यू, द्रवरूप पोलादाचा स्फोट ठरला घातक



Post Your Comment