
सेवारत जन स्वधर्म तत्पर, याच शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपपुर्ती म्हणा किंवा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेल्या कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळ बारा वर्षांचा होता इंदिरा गांधींचा काळ चौदा वर्षांचा होता पण मोदींनी सलग बारा वर्षे राज्य करून नेहरूंचा रेकॉर्ड मोडला. त्यामुळे देशभर आणि परदेशातही त्याचे सेलिब्रेशन सुरू आहे.
पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीचे वर्णन सेवारत जन या शब्दांनी जरूर करता येईल कारण त्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्या तत्त्वानुसार जनतेची सेवाच केली. त्यांच्या कारकिर्दीत काही चुका घडल्या असतील. काही धोरणे चुकली असतील, पण म्हणून त्यांनी काही सेवाच केली नाही आणि सगळे देशहिताच्या विरोधात केले असे म्हणणे सुद्धा चूक ठरेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा स्वतः तसे कधी म्हटले नाही.
- मोदींच्या कारकिर्दीचे वेगळेपण
पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दी बाबत मात्र सेवारत जन स्वधर्म तत्पर याच शब्दांनी तिचे वर्णन करावे लागेल. यातले स्वधर्म तत्पर हे दोन शब्द पंतप्रधान पंडित नेहरू पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतला भेद नेमकेपणाने दर्शवितात.
- नेहरूंवर पाश्चात्य विचारांचा पगडा
कारण पंतप्रधान पंडित नेहरूंची जडणघडण स्वधर्म म्हणजेच भारतीयत्वापेक्षा पाश्चिमात्य विचारांनी अधिक झाली होती. पाश्चात्य विचार ही पंडित नेहरूंची जीवन निष्ठा होती. पाश्चात्य विचारांचा त्यांच्यावर फार मोठा पगडा होता. त्यामुळे भारताला त्यांनी त्यांच्या परिभाषेतल्या धर्मनिरपेक्षतेच्या वाटेवर नेले. त्या वाटेवरून नेहरूंनी देशाची वैज्ञानिक प्रगती करायचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यश सुद्धा मिळाले, पण शेवटी ती वाट इस्लामी जिहाद कडे गेली. तिचे दुष्परिणाम संपूर्ण भारताला भोगावे लागले.
- इंदिरा गांधींची एकाधिकारशाही
पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या कारकिर्दीत भारताला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी वळणे घ्यायला लावली. त्यातली काही वळणे सकारात्मक सुद्धा होती. पण त्यांनी एकाधिकारशाहीचे टोक गाठल्याने त्यांचीच कारकीर्द झाकोळली. इंदिरा गांधींनी त्यांच्या शेवटच्या काळात “धार्मिक” होऊन इस्लामी जिहादची वाट रोखायचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. उलट त्यांच्या काळात धार्मिक दहशतवादाने डोके वर काढले.
- आधीच्या हिंदुत्ववाद्यांचे अपयश
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दींमधल्या अनुभवातून बरेच शिकले. किंबहुना या दोन काँग्रेसी पंतप्रधानांच्या कारकिर्दीतून शिकण्याखेरीज त्यांना पर्याय नव्हता. कारण ते ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात, त्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पूर्वसुरींना भारताचा राज्यशकट हाकण्याची कधी संधीच मिळाली नव्हती. भारतीय जनतेचा पाठिंबा मिळवण्यात मोदींच्या हिंदुत्ववादी पूर्वसुरींना कधी यश मिळाले नव्हते. त्यामुळे मोदींचे हिंदुत्ववादी पूर्वसूरी देशाचे हिंदुत्ववादी राज्यकर्ते होऊ शकले नव्हते.
- जनतेच्या पाठिंब्यामुळे मोदी स्वधर्म तत्पर
पण मोदी देशाचे हिंदुत्ववादी राज्यकर्ते झाले. त्यात त्यांच्या स्वकर्तृत्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा, पूर्वसूरींनी केलेल्या संस्कारांचा मोठा भाग होताच पण त्या पलीकडे जाऊन भारतीयांच्या खऱ्या अर्थाने मत परिवर्तनाचा भाग अधिक मोठा होता. त्यामुळेच मोदी सेवारत राहिलेच, पण ते स्वधर्म तत्परही राहू शकले. मोदींना भारतीय जनतेने भरभरून पाठिंबा दिला नसता, तर ते फक्त सेवारत राहू शकले असते, पण स्वधर्म तत्पर राज्यकर्ते घडू शकले नसते.
– पण लिबरल नॅरेटिव्हला भेदण्यात अपयश
मोदींच्या कारकिर्दीत हिंदू जनजागरण फार झाले किंबहुना हिंदू जनजागरण झाले म्हणूनच मोदींची कारकीर्द यशस्वी झाली. त्यामध्ये लिबरल अडथळे अनेक आले. त्यातल्या अनेकांवर मोदींना मात करता आली. पण लिबरल नॅरेटिव्ह वर मोदींना आणि त्यांच्या अनुयायांना मात करता आलेली नाही. मोदी सेवारत आणि स्वधर्म तत्पर राहिले तरी ते स्वतः आणि त्यांचे अनुयायी लिबरल नॅरेटिव्हला पर्यायी नॅरेटिव्ह तयार करू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या कारकिर्दीतला बहुतांश भाग लिबरल नॅरेटिव्हला उत्तरे शोधण्यात आणि प्रत्युत्तरे देण्यात गेला.
– FICCI सरचिटणीस अनंत स्वरूप : “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते बनले आहेत; हा काळ राजकीय स्थिरता आणि धोरणांमधील सातत्याचे प्रतीक आहे. २६ मे २०१४ पासून त्यांनी सलग तीन सरकारांचे नेतृत्व केले आहे आणि या सरकारांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत – मग ते जीएसटी (GST) असो, पीएलआय (PLI) योजना असोत किंवा इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट (Insolvency Act) असो. या सर्व निर्णयांनी देशातील गुंतवणुकीच्या वातावरणावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे, ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये (व्यवसाय सुलभतेत) सुधारणा केली आहे आणि भारतीय उद्योगांची सर्वच क्षेत्रांतील स्पर्धात्मक क्षमता वाढवली आहे…”
Longest serving prime minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल
- Philippines : फिलिपिन्समध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागांत सतर्कता
- Netanyahu : ट्रम्प यांच्या सूचनेकडे नेतान्याहूंचे दुर्लक्ष, इराणवर जोरदार हवाई हल्ला; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
- पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!



Post Your Comment