Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

IMD Monsoon : यंदा ‘सरासरीपेक्षा कमी’ पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाने जारी केला पहिला अधिकृत अंदाज

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण 'सामान्य पेक्षा कमी' या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : IMD Monsoon देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण ‘सामान्य पेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.IMD Monsoon

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’ (El Niño) या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी ‘एल निनो’च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.IMD Monsoon



पावसाचे मोजमाप : IMD च्या पाच श्रेणी

भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्यासाठी पाच प्रमुख स्तर निश्चित केले आहेत:

अपुरा पाऊस: सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी.
सरासरीपेक्षा कमी: ९० ते ९५ टक्के (यंदाचा अंदाज याच श्रेणीत आहे).
सामान्य पाऊस: ९६ ते १०४ टक्के.
सरासरीपेक्षा अधिक: १०५ ते ११० टक्के.
सर्वाधिक पाऊस: ११० टक्क्यांच्या पुढे.
बळीराजा आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

खाजगी हवामान संस्थांनी यापूर्वीच मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले होते, त्यावर आता सरकारी मोहोर उमटली आहे. पावसाचे प्रमाण ९२ टक्के राहिल्यास शेतीकामांचे नियोजन, पेरण्या आणि पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असल्याने, हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार

“पावसाचे प्रमाण कमी असले तरी त्याचे वितरण (Distribution) कसे राहते, हे महत्त्वाचे आहे. जूनमध्ये मान्सूनचे आगमन आणि त्याची वाटचाल कशी होते, यावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असेल,” असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच अखेरच्या टप्प्यात पावसाचे वितरण कसे राहते, यावर बरेच काही अवलंबून असेल. हवामान विभाग मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर करेल, ज्यामध्ये प्रादेशिक पातळीवरील पावसाच्या वितरणाची अधिक स्पष्ट माहिती मिळेल.

IMD Monsoon Forecast 2026: India to Expect ‘Below Normal’ Rainfall at 92% LPA

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment