Trending News

No trending news found.

Wednesday, 10 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

डोनाल्ड ट्रम्पची धमकी अमेरिकेवरच उलटली; इराणने अमेरिका आणि मित्र देश सोडून इतरांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी केली खुली!!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी अमेरिकेवरच उलटली इराणने अमेरिका आणि त्याचे मित्र देश सोडून इतर देशांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी खुली केली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी अमेरिकेवरच उलटली इराणने अमेरिका आणि त्याचे मित्र देश सोडून इतर देशांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी खुली केली.

होर्मूजची समुद्रधुनी खुली करा, नाहीतर येथे 48 तासांत इराणवर असे हल्ले करू, की त्याचे सगळेच इंधन उत्पादनाचे मार्ग कायमचे बंद होतील, अशी दमबाजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. पण अमेरिकेच्या या दमबाजीचा इराणवर कुठलाही प्रतिकूल परिणाम झाला नाही. उलट इराणने अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र सोडून इतर सर्व देशांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी खुली करायची घोषणा केली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची गोची झाली.

– अमेरिकेची गोची

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण मधल्या इंधन उत्पादन केंद्रावर हल्ले करायचे आदेश दिले, तर बाकीचे देशच अमेरिकेच्या विरोधात जातील कारण बाकी सर्व देशांना इराणचे सर्व प्रकारचे इंधन हवे आहे आणि इराणने आणि इराणने जर होर्मूजची सामुद्रधुनी खुली केली, तर इतर देशांचा फायदा आहे अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण मधल्या इंधन उत्पादन केंद्रांवर हल्ले करायचे आदेश दिले तर भारत चीन रशिया, जपान यांच्यासह आखाता मधले अमेरिकेचे मित्र देश सुद्धा अमेरिकेच्या विरोधात जातील. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ला करायच्या क्षमतेवर मोठा आघात होईल. म्हणूनच इराणने अत्यंत चतुराईने होर्मूजची सामुद्रधुनी अमेरिका आणि त्याचे मित्र देश सोडून इतर सर्व देशांना खुली करून टाकली.

– जपानी नौदलाची तयारी

होर्मूजच्या सामुद्रधुनीमधील सर्व पाणसुरुंग काढून टाकण्याची तयारी जपानी नौदलाने दाखविली. होर्मूजच्या सामुद्रध्वनी क्षेत्रात जर अमेरिका आणि इराण यांनी एकत्र येऊन युद्धबंदी केली, तर जपानी जहाजे होर्मूज मधली सर्व पाणसुरुंग काढून टाकतील. त्यामुळे व्यापारी आणि प्रवासी जहाजांना सुरक्षित प्रवास करता येऊ शकेल, अशी ऑफर जपानी सरकारने इराणला दिली. ती इराणने मान्य सुद्धा केली. त्यामुळे अमेरिकेची मोठी गोची झाली. पण इराणकडून इंधन आयात करणाऱ्या सर्व देशांची मात्र चांगली सोय झाली.

Donald Trump’s threat backfired on America itself.

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment