विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’च्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग आणि वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. Devendra Fadnavis
उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AI वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis chairs a review meeting on summer peak demand
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध मोडून काढून महिलांना आरक्षण देण्याचा पण नरेंद्र मोदींचा दृढसंकल्प!!
- पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!
- Gold & Silver : 15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला; SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट
- Prakash Raj : प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर भगवान राम आणि रामायणाची खिल्ली उडवल्याचा आरोप



Post Your Comment