
नाशिक : लोकसभेत काल महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयके फेटाळून लावल्यानंतर मोदी सरकार आक्रमक झाले. भाजपच्या नेत्यांनी विधेयके फेटाळण्याचे सगळे खापर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर फोडले. यातून मोदी सरकारचा राजकीय इरादा स्पष्ट झाला. पण त्या इराद्यालाच झटका देण्यासाठी काँग्रेसने आज प्रियांका गांधींचे प्यादे पुढे सरकवल्याचे दिसून आले.
महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन या मुद्द्यांवर भाजपला आक्रमक होण्याची संधी मिळू नये यासाठी काँग्रेसने डाव खेळत जुन्याच महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन करण्यासाठी प्रियांका गांधी यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली. प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन 2029 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देऊन महिला आरक्षण अंमलात आणा, अशी मागणी केली.
#WATCH | Delhi: Congress MP Priyanka Gandhi Vadra says, "Our stand is very clear. The entire INDIA alliance has made its stand very clear, and this vote has made it even clearer that, in our understanding, this bill that was introduced and the three-day discussion was not about… pic.twitter.com/6GkCRVtPXK
— ANI (@ANI) April 18, 2026
– राहुल ऐवजी प्रियांका
एरवी कुठल्याही महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पत्रकार परिषदा घेत असत. पण काँग्रेसच्या नेत्यांनी आज मात्र राहुल गांधी किंवा खर्गे यांच्या ऐवजी प्रियांका गांधींना काँग्रेस तर्फे अधिकृत पत्रकार परिषद घ्यायला लावली. त्यातून काँग्रेसचाही इरादा स्पष्ट झाला. मोदी सरकार जर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर ठपका ठेवायला आक्रमक झाले, तर भाजपवर प्रतिहल्ला करण्यासाठी राहुल गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी तेवढ्याच आक्रमकपणे पुढे येतील, याची चुणूक त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधून काँग्रेसने दाखवून दिली.
– इंदिरा गांधींचे प्रतिबिंब
तसेही अनेक काँग्रेस नेते प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींचे प्रतिबिंब पाहतच आलेत. इंदिरा गांधींनंतर प्रियांका गांधींचेच नेतृत्व काँग्रेसला सावरून धरेल, अशी अनेक काँग्रेस नेत्यांची पहिल्यापासून धारणा आहे. पण सोनिया गांधींनी प्रियांका गांधी यांना पुढे आणण्याऐवजी राहुल गांधींना पुढे आणणे पसंत केले होते. पण 2014 पासून झालेल्या लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये राहुल गांधींचे नेतृत्व अपयशी ठरले. नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यात राहुल गांधी कमी पडले. त्यामुळेच आता राहुल गांधींच्या ऐवजी किंवा त्यांच्या बरोबरीने तरी प्रियांका गांधींचे नेतृत्व पुढे सरकवणे सोनिया गांधींना भाग पडले. म्हणूनच महिला आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसने चतुराईने प्रियांका गांधींना पत्रकार परिषद घ्यायला लावून त्यांचे प्यादे पुढे सरकवले.
Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “Our stand is very clear.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींनी लिहिले, भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!; पण लाडक्या बहिणींचा कसा आणि कुठे बसेल फटका??
- राहुल गांधींचे ब्रिटिश आणि भारतीय दुहेरी नागरिकत्व; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे FIR दाखल करण्याचे आदेश, CBI चौकशी करा!!
- YouTube : यूट्यूब ॲपमधून असे पूर्णपणे हटवा ‘शॉर्ट्स’; रीलचे व्यसन सोडवण्यात होईल मदत
- Anil Ambani :



Post Your Comment