
नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीसाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. ममता बॅनर्जी कोलकात्याहून दिल्लीला रवाना झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी हे दोन नेते देखील होते.After losing the West Bengal elections, Mamata Banerjee quietly leaves Kolkata for Delhi for the INDI alliance meeting!!
– एकेकाळाचा ममतांचा रुबाब
ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असताना त्या “इंडी” आघाडीच्या बैठकीत क्वचितच सामील झाल्या. त्या बैठकीला येणार की नाही??, आल्या तर कशासाठी येतील??, त्यांच्या अटी शर्ती काय असतील??, वगैरे बातम्या त्यावेळी चालत होत्या. सोनिया गांधी यांच्या पाठोपाठ “इंडी” आघाडीत ममता बॅनर्जी यांचे स्थान होते. ममता बॅनर्जी आघाडीच्या बैठकीला आल्या. त्या आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्या काही बोलल्या. त्या काही बोलल्या नाहीत. त्यांना “इंडी” आघाडीच्या नेत्यांनी खुर्ची दिली किंवा खुर्ची दिली नाही, अशा बातम्यांना सुद्धा त्यावेळी फार महत्त्व आले होते. ममता बॅनर्जी यांनी आपल्या सत्तेच्या आधारे इंडी आघाडीतले स्थान कायमच मजबूत आणि चर्चेचे ठेवले होते.
– काँग्रेसला कायमच झिडकारले
#WATCH | Kolkata, West Bengal: TMC Chairperson Mamata Banerjee leaves for Delhi from Kolkata airport.
TMC leaders Dola Sen and Kalyan Banerjee are also present. pic.twitter.com/s5TwefyXYf
— ANI (@ANI) June 7, 2026
पण त्याचवेळी ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला बिलकुल विचारत नव्हत्या. किंबहुना त्या काँग्रेस पासून दोन नाही तर चांगले चार पाच हात अंतर ठेवून लांब राहात होत्या. त्यांनी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला अतिशय कस्पटा सारखी वागणूक दिली होती. काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांची तर त्या बोलत सुद्धा नव्हत्या. त्या थेट सोनिया गांधींशी बोलायच्या किंवा अगदीच बोलल्या तर मल्लिकार्जुन खर्गे किंवा राहुल गांधींशी बोलायच्या त्यांच्या खालच्या नेत्यांशी ममता बॅनर्जी बोलायचं सुद्धा नाहीत. त्या काँग्रेसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना आपल्यापाशी फटू सुद्धा द्यायच्या नाहीत.
– पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराला घाबरल्या
पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी आघाडी करायला नकार दिला. काँग्रेसने मागितलेल्या किरकोळ जागा सुद्धा द्यायला नकार दिला. त्या स्वतंत्र लढल्या आणि अख्खी निवडणूक हरल्या. त्या पाठोपाठ ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये दोन तृतीयांश फूट पडली. 59 आमदार त्यांच्या विरोधात गेले. 18 खासदार विरोधात जायला लागले. त्याबरोबर ममता बॅनर्जी “जाग्यावर” आल्या आणि आज त्या मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीला जाण्यासाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. त्या घरातून गाडीत बसून कोलकत्याच्या विमानतळावर आल्या. पत्रकारांकडे ढुंकूनही न पाहता त्या गाडीतून उतरून विमानतळात गेल्या. यावेळी त्यांच्या मागोमाग खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी होते. पत्रकारांनी दीदी ओ दीदी अशा त्यांना हाका मारल्या पण त्यांनी पत्रकारांकडे लक्ष दिले नाही. मग पत्रकारांनी कल्याण बॅनर्जींना ओ कल्याणदा अशा हाका मारल्या पण कल्याण बॅनर्जींनी सुद्धा पत्रकारांकडे लक्ष दिले नाही. पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तर देणे ऐवजी मुकाट्याने विमानतळात निघून गेले.
– अभिषेक बॅनर्जी दिल्लीत
ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे कालच कोलकत्यातून दिल्लीला आले. ते “इंडी” आघाडीच्या बैठकीत सामील होणार असल्याच्या बातम्या आल्या. याचा अर्थ फक्त अभिषेक बॅनर्जी हेच तृणमूल काँग्रेसच्या वतीने “इंडी” आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. ममता बॅनर्जी काही येणार नाहीत, असा काढला गेला, पण प्रत्यक्षात ममता बॅनर्जी “इंडी” आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कोलकात्यातून मुकाट्याने कोलकात्यातून दिल्लीला रवाना झालेल्या दिसल्या.
After losing the West Bengal elections, Mamata Banerjee quietly leaves Kolkata for Delhi for the INDI alliance meeting!!
महत्वाच्या बातम्या
- OBC समाजातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
- पेट्रोलही चालेल, इथेनॉलही! मारुतीची देशातील पहिली फ्लेक्स-फ्युएल वॅगनआर सादर; इंधन खर्चात मोठी बचत होणार
- DMK : ‘२० वर्षांची मैत्री तुटली’; इंडिया आघाडीच्या बैठकीपासून द्रमुक दूर, विरोधकांच्या ऐक्यावर मोठा प्रश्नचिन्ह
- गोल्ड किंग’वर सेबीचा मोठा प्रहार! १५.१५ लाख कोटींच्या महसूल फुगवट्याचा आरोप; समभाग व्यवहारांवर बंदी



Post Your Comment