
नाशिक : मोदी सरकारची तपपूर्ती; विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी!!, याच राजकीय घडामोडी आज राजधानी नवी दिल्लीतून समोर आल्या.
नरेंद्र मोदी निवडून आलेले सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान ठरले. त्यांच्या सरकारची बारा वर्षे झाली म्हणजेच नरेंद्र मोदी सलग एक तप पंतप्रधान पदावर राहिले. या काळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष ठराव करून त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना अभिवादन करून अभिनंदन स्वीकारले.
भारत मंडपम मध्ये मोदींचे अभिनंदन
त्याचवेळी भारत मंडपम पण मध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारा ठराव मांडून तो संमत केला. या कार्यक्रमाला भाजप आणि मित्रपक्ष शासित 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच महत्त्वाचे केंद्रीय मंत्री हजर राहिले. भाजपचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नेतृत्व प्रस्थापित झाले. मोदींच्या अभिनंदनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह आदी महत्त्वाच्या नेत्यांनी लेख लिहिले. त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती राधाकृष्णन आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नरेंद्र मोदींना विशेष पत्रे लिहून त्यांचे अभिनंदन केले.
विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी
मोदी सरकारच्या तपपूर्ती निमित्त दिल्लीत असे सेलिब्रेशन रंगले असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र (बचावासाठी) गाठीभेटी घेतल्याचे चित्र समोर आले.
मीनाक्षी नटराजन अर्ज बाद प्रकरण
काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराज यांनी कर्नाटकातून राज्यसभेसाठी भरलेला अर्ज तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला त्यामुळे चिडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन कर्नाटक मधल्या निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, वकील अभिषेक मनू सिंघवी, दिग्विजय सिंह आदी नेत्यांचा समावेश होता. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर ते निर्णय देतील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी या भेटीनंतर सांगितले.
अभिषेक बॅनर्जी – राहुल गांधी भेट
या दरम्यान दिल्लीत आणखी एक महत्त्वपूर्ण गाठ भेट झाली. अभिषेक बॅनर्जी यांनी १०, जनपथ वर जाऊन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी कालच तिथेच जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पराभूत झालेली तृणमूल काँग्रेस आणि मूळ काँग्रेस हे दोन्ही पक्ष लवकरच एकमेकांमध्ये विलीन होतील, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
दोन काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान गांधी परिवार आणि ममता बॅनर्जींचा परिवार एकमेकांना पाण्यात पाहात होते. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भाजपने या दोन्ही पक्षांचा तिथे दणकून पराभव केला. त्यानंतर गांधी परिवार आणि बॅनर्जी परिवार बरेच “जाग्यावर” आलेले दिसले. त्यांना लगेच राजकीय वास्तवाचे भान आले. त्यामुळे त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला. गेल्या दोनच दिवसांमध्ये सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या दोनदा भेटी झाल्या, तर अभिषेक बॅनर्जी यांनी सुद्धा राहुल गांधींची दोनदा भेट घेतली. याच दरम्यान ममता बॅनर्जी या अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जाऊन भेटल्या.
बचावाचे गौडबंगाल
विरोधकांनी स्वतःच्या राजकीय बचावासाठीच या भेटीसाठी घेतल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी मीनाक्षी नटराजन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या बचावासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, तर बॅनर्जी कुटुंबाने तृणमूळ काँग्रेसच्या बचावासाठी गांधी परिवाराची भेट घेतली. मोदी सरकारच्या तपापूर्तीच्या दिवशी या सगळ्या विरोधकांच्या बचावात्मक भेटीगाठी घडल्या. मात्र माध्यमांनी या सगळ्या घडामोडींचे विस्कळीत वार्तांकन केल्याने त्यातली राजकीय विसंगती कुणाला टिपता आली नाही. ती वर नमूद केली आहे.
Completion of the Modi Government’s Term
महत्वाच्या बातम्या
- TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल
- Philippines : फिलिपिन्समध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागांत सतर्कता
- Netanyahu : ट्रम्प यांच्या सूचनेकडे नेतान्याहूंचे दुर्लक्ष, इराणवर जोरदार हवाई हल्ला; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
- पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!



Post Your Comment