Trending News

No trending news found.

Tuesday, 19 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

नाशिक : पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!, असंच म्हणायची वेळ उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वातून आली. Congress Worker पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसने स्वतंत्रपणे लढून भाजपला ममता बॅनर्जींची सत्ता घालवायला मदत केली, त्याच पद्धतीने काँग्रेस उत्तर प्रदेशात कामाला लागल्याची चिन्हे आज पासून दिसू लागली. ममतांच्या पराभवासाठी काँग्रेसचा हातभार पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसला जवळ केले नाही. काँग्रेसही त्यांच्याजवळ गेली नाही. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचे फक्त दोन आमदार निवडून आले, पण काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या तृणमूळ 24 आमदार पाडले. काँग्रेसने ममता बॅनर्जींना आपले चांगलेच उपद्रवमूल्य दाखवून दिले. याचा फायदा […]

नाशिक : पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!, असंच म्हणायची वेळ उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वातून आली. Congress Worker

पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसने स्वतंत्रपणे लढून भाजपला ममता बॅनर्जींची सत्ता घालवायला मदत केली, त्याच पद्धतीने काँग्रेस उत्तर प्रदेशात कामाला लागल्याची चिन्हे आज पासून दिसू लागली.

ममतांच्या पराभवासाठी काँग्रेसचा हातभार

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसला जवळ केले नाही. काँग्रेसही त्यांच्याजवळ गेली नाही. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचे फक्त दोन आमदार निवडून आले, पण काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या तृणमूळ 24 आमदार पाडले. काँग्रेसने ममता बॅनर्जींना आपले चांगलेच उपद्रवमूल्य दाखवून दिले. याचा फायदा भाजपला झाला.

काँग्रेसने समाजवादी पार्टी आणि बसपा फोडली

काँग्रेसने उत्तर प्रदेशात आपल्या राजकीय कृतीचे तसेच रिपीटेशन केले. काँग्रेसने उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीचे आणि बहुजन समाज पार्टीचे नेते, कार्यकर्ते फोडले. ते आपल्या पक्षात घेतले. काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांनी काँग्रेसच्या कृतीचे समर्थन केले. काँग्रेस २०२७ च्या च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ज्यांना संविधानाविषयी आदर आहे, ज्यांना संविधान वाचवायचे आहे, ते नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. काँग्रेसला योगी आदित्यनाथ सरकारचा पराभव करायचा आहे. भाजपला उत्तर प्रदेशातून उखडून फेकून द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष वाढवत आहोत, असे वक्तव्य अविनाश पांडे यांनी केले.

अविनाश पांडे यांच्या या वक्तव्यातूनच काँग्रेस उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा पराभव करायला आणि भाजपला अप्रत्यक्ष मदत करायला तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसने भाजपचे नेते फोडले नाहीत, तर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे नेते फोडले. ज्यावेळी काँग्रेस सकट बाकीच्या सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन मुकाबला करायची गरज आहे, त्यावेळी काँग्रेसने विरोधकांनाच नामोहरम केले. काँग्रेसने पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी हातभार लावला. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या पराभवासाठी हातभार लावण्याचे काम चालू केले. हेच राजकीय सत्य काँग्रेसच्या राजकीय कृतीतून समोर आले.

रस्त्यावरच्या नमाजाचे काँग्रेसकडून समर्थन

बाकी अविनाश पांडे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नमाज विषयक वक्तव्याचा निषेध केला. योगी आदित्यनाथ यांनी मुसलमान समाजाला रस्त्यावर नमाज पडायला विरोध केला. पण पण योगी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करून अविनाश पांडे यांनी रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले. या समर्थनातून त्यांनी सामाजिक ध्रुवीकरणाला हातभार लावला. ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाला.

Saharanpur, Uttar Pradesh: On Samajwadi Party & BSP leaders joining Congress during Congress Workers’ Conference

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment