Trending News

No trending news found.

Tuesday, 19 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

तामिळनाडू मध्ये सगळ्या आम्हा कँटीनच्या नूतनीकरणाचे आदेश काढून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी एका झटक्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांमध्ये पाचर मारून ठेवली. तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन पुन्हा सुरू करून विजय जोसेफ यांनी सामान्य जनतेची सोय केलीच

नाशिक : तामिळनाडू मध्ये सगळ्या आम्हा कँटीनच्या नूतनीकरणाचे आदेश काढून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी एका झटक्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांमध्ये पाचर मारून ठेवली. तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन पुन्हा सुरू करून विजय जोसेफ यांनी सामान्य जनतेची सोय केलीच, त्याचबरोबर स्वतःची त्यापेक्षा मोठी राजकीय सोय करून घेतली. Amma Canteens

जयललितांची मूळ योजना

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातल्या गरिबांना कमीत कमी पैशांमध्ये पुरेसे अन्न मिळावे, यासाठी अम्मा कॅन्टीनची योजना सुरू केली होती. या योजनेतून जयललिता यांच्या सरकारने चेन्नई सह वेगवेगळ्या महापालिका परिक्षेत्रांमध्ये ५५० पेक्षा जास्त अम्मा कॅन्टीन सुरू केली होती‌. या योजनेला सरकारचे अनुदान असल्याने तिथे धान्य पुरवठ्यात कुठली अडचण येत नव्हती. खुद्द जयललिता यांच्या सरकारने आणि त्यानंतर आलेल्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अम्मा कॅन्टीनची योजना निर्वेध सुरू ठेवली होती. ओ. पनीरसेलवन आणि इडापड्डी पलानीस्वामी या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अम्मा कॅन्टीनला कधीच धान्य आणि अनुदान कमी पडू दिले नव्हते.

पण तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघमचे एम. के. स्टालिन यांचे सरकार आल्याबरोबर त्यांनी अम्मा कॅन्टीनच्या अनुदानाला कात्री लावली. त्यामुळे ही कॅन्टीन एकतर कशीबशी चालू राहिली किंवा अनेक कॅन्टीन बंद पडली. अनेक कॅन्टीनमध्ये अन्नपदार्थ महाग झाले.



द्रमूक आणि अण्णा द्रमूक मध्ये पाचर

पण तामिळनाडूमध्ये जोसेफ विजयचे सरकार आल्यावर त्याने लगेच अम्मा कॅन्टीन योजनेला बळ द्यायचा निर्णय घेतला. सध्या चेन्नई मध्ये ३८३, तर अन्य महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये २३७ अम्मा कॅन्टीन सुरू आहेत. विजय जोसेफ सरकारने या सर्व अम्मा कॅन्टीनसाठी धान्य पुरवठा आणि अनुदान पुरवठा पुन्हा सुरू केला. जोसेफ विजयने एका निर्णयातून अण्णा द्रविड मुन्नेत्र कळकम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय पाचर मारली. एकतर द्रविड मुन्नेत्र कळघमला नको असलेले नाव या योजनेच्या निमित्ताने पुनरुज्जीवीत केले. त्याचवेळी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला हवे असलेले नाव स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरले.

अण्णा द्रमुक मधल्या फुटीला बळ

जोसेफ विजय यांचे सरकार फक्त सहा महिने चालेल. ते लवकरच पडेल, असे भाकीत द्रविड मुन्नेत्र कळमच्या आमदारांनी करायला सुरुवात केली होती. पण त्याचवेळी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या आमदारांमध्ये फूट पडून त्या पक्षाच्या 22 आमदारांनी विजयला पाठिंबा दिला. विजयने अम्मा कॅन्टीनला बळ दिल्याबरोबर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या फुटीसाठी सुद्धा राजकीय बळ मिळाले. आपल्याला हवे असलेले जयललितांचे नाव आता मुख्यमंत्री जोसेफ विजय हेच पुढे चालवतायेत, असे म्हणायला इडापड्डी पलानीस्वामी यांच्या विरोधकांना संधी मिळाली. परिणामी विजय जोसेफ याला पाठिंबा देण्यासाठी चांगले कारण सुद्धा मिळाले. त्यामुळे विजय जोसेफ सरकारचा विधानसभेतला संख्याबळाचा पाठिंबा मजबूत झाला.

याचाच अर्थ विजय जोसेफ याने अम्मा कॅन्टीनच्या योजनेला बळ देऊन एकाच वेळी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय पाचर मारून ठेवली.

Tamil Nadu Chief Minister C Joseph Vijay has ordered the renovation and modernisation of Amma Canteens.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment