Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

राहुल गांधींचा ममतांच्या विरुद्ध जोरात प्रचार; पण भाई जगतापांचा ममतांनाच कौल!!

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध जोरदार प्रचार केला, पण आज मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते भाई जगताप यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्याच बाजूने कौल दिला. काँग्रेस मधली ही मोठी राजकीय विसंगती मतदानाच्या दिवशीच उघड्यावर आली

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध जोरदार प्रचार केला, पण आज मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते भाई जगताप यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्याच बाजूने कौल दिला. काँग्रेस मधली ही मोठी राजकीय विसंगती मतदानाच्या दिवशीच उघड्यावर आली. Rahul Gandhi

– राहुल गांधींचा ममता विरोधी प्रचार

पश्चिम बंगालचे विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविली‌. स्वतः राहुल गांधींनी आणि प्रियांका गांधींनी राज्यामध्ये जाऊन काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला. या प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला जोरदार टार्गेट केले. ममता बॅनर्जी यांनी चांगला कारभार केला असता, तर भाजपला पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली नसती. पण ममता बॅनर्जी चांगला कारभार केला नाही. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी केली. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये भाजपला डोके वर काढायची संधी मिळाली, असा आरोप राहुल गांधींनी प्रचारादरम्यान केला होता.

– भाई जगताप यांचे वक्तव्य

पण राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या विसंगत जाऊन मुंबईतले काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ममता बॅनर्जी यांच्या कारभाराची आजच प्रशंसा केली. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल मधल्या लोकांचा पाठिंबा आहे कारण त्यांनी लोकांसाठी भरपूर काम केले आहे. काँग्रेसने जरी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी ममता बॅनर्जी लोकप्रिय नेते आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही, असा दावा भाई जगताप यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची पुन्हा सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला.

– काँग्रेस मधली विसंगती

पण आपण राहुल गांधींनी केलेल्या प्रचाराच्या विरोधात बोलतो आहोत याचे साधे भान सुद्धा भाई जगताप यांना राहिले नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमधली मोठी राजकीय विसंगती मतदानाच्या दिवशीच उघड्यावर आली.

Rahul Gandhi campaigns vigorously against Mamata; yet Bhai Jagtap sides with Mamata!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment