Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

AAP Crisis : आपच्या 7 खासदारांच्या भाजपत विलीनीकरणास मंजुरी; राज्यसभेत भाजप खासदार 106 वरून 113 झाले

राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) सात बंडखोर खासदारांच्या भाजपामधील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर राज्यसभेत आपची सदस्यसंख्या घटून 3 झाली आहे, तर भाजप खासदारांची संख्या 106 वरून वाढून 113 झाली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : AAP Crisis  राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) सात बंडखोर खासदारांच्या भाजपामधील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर राज्यसभेत आपची सदस्यसंख्या घटून 3 झाली आहे, तर भाजप खासदारांची संख्या 106 वरून वाढून 113 झाली आहे.AAP Crisis

भाजपामध्ये सामील झालेल्या सात खासदारांमध्ये राघव चढ्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या अधिकृत वेबसाइटवरही या खासदारांना भाजपचे सदस्य म्हणून दाखवण्यात आले आहे.AAP Crisis

आपने रविवारी सभापतींकडे सातही खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. संजय सिंह यांनीही पत्र लिहून त्यांना पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवत अपात्र घोषित करण्याची विनंती केली होती.AAP Crisis



संजय सिंह यांच्या मते, आप (AAP) ने वकील कपिल सिब्बल आणि लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांच्यासह अनेक घटनात्मक तज्ञांचा सल्ला घेतला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, संविधानाच्या 10 व्या अनुसूचीनुसार सर्वात आधी पक्षाला प्रस्ताव मंजूर करून दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. कोणताही खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही.

3 खासदारांनी नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला

आप (AAP) च्या 10 राज्यसभा खासदारांपैकी राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आरोप केला होता की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून भरकटला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खासदारांनी शुक्रवारी राज्यसभा सभापतींना अर्ज करून स्वतःला भाजप खासदार म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती, जी आता स्वीकारण्यात आली आहे.

राघव म्हणाले- मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे

राघव म्हणाले होते की, गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. म्हणून आज मी घोषणा करतो की मी ‘आप’पासून दूर जात आहे आणि जनतेच्या जवळ जात आहे. राजकारणात येण्यापूर्वी, मी एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट (CA) होतो. या व्यासपीठावर माझ्यासोबत विविध क्षेत्रांतील लोक होते.

स्वाति मालीवाल म्हणाल्या – केजरीवाल महिलाविरोधी आहेत

स्वाति मालीवाल यांनी सांगितले होते की, त्यांनी 2006 पासून केजरीवाल यांच्यासोबत काम केले, प्रत्येक आंदोलनात साथ दिली, पण नंतर त्यांच्यासोबत पक्षात गैरवर्तन झाले. त्यांनी आरोप केला की, त्यांच्या घरी त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि एफआयआर (FIR) मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

AAP Crisis: RS Chairman Approves Merger of 7 Rebel MPs into BJP

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment