Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Amravati Case : अमरावती लैंगिक शोषण प्रकरण; 8 पीडितांपैकी पहिली मुलगी आली समोर, नोंदवला ‘SIT’ समोर जबाब

अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली असून, यामुळे आरोपींविरोधात पुराव्यांची साखळी अधिक भक्कम झाली आहे.

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Amravati Case अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली असून, यामुळे आरोपींविरोधात पुराव्यांची साखळी अधिक भक्कम झाली आहे.Amravati Case

या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने काही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ काढले होते. या प्रकरणातील इतर सात पीडित मुलींची ओळख पटली असली, तरी बदनामीच्या भीतीने त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. मात्र, नागपूरच्या या पीडितेने पुढाकार घेतल्यामुळे पोलिसांसमोर असलेली सर्वात मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. आता पीडितेच्या थेट जबाबामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Amravati Case



२५० किलोमीटरचा प्रवास अन् असीम धैर्य

मिळालेल्या माहितीनुसार, या पीडितेने शनिवारी नागपूर ते अमरावती (परतवाडा) असा तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले. यवतमाळच्या पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील महिला पथकाने तिचा जबाब नोंदवून घेतला.

अशी झाली होती आरोपीशी ओळख

या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने काही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे चित्रीकरण केले होते. इतर ७ पीडित मुलींची ओळख पटली असली तरी, समाजात बदनामी होईल या भीतीने त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. इतर मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढले गेले असताना, ही नागपूरची पीडिता मात्र एका ‘उर्स’ दरम्यान आरोपीच्या ‘ऑफलाईन’ संपर्कात आली होती. या पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे आता इतर मुलींनाही पुढे येण्यासाठी बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपींवरील कायद्याचा फास होणार घट्ट

पोलिसांनी सुरुवातीला हा गुन्हा स्वतःहून (suo motu) दाखल केला होता, जो केवळ गोपनीय सूत्रांच्या माहितीवर आधारित होता. मात्र, आता पीडितेचा प्रत्यक्ष जबाब मिळाल्यामुळे पोलिस एफआयआरमध्ये पॉक्सो (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) अधिक कडक कलमांचा समावेश करणार आहेत.

पोलिसांसमोर होते मोठे आव्हान

१३ एप्रिल रोजी दाखल झालेला हा गुन्हा तांत्रिक पुराव्यांवर उभा होता. अयानच्या चौकशीत आठ पीडितांची नावे निष्पन्न झाली होती, मात्र एकही पीडिता अधिकृत तक्रार द्यायला तयार नसल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला होता. नागपूरच्या या मुलीने पुढाकार घेतल्याने आता अयान आणि त्याच्या टोळीला कडक शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मुलगी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि निरोगी असून तिचा जबाब तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Amravati Case Update: First Victim Records Statement Before SIT

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment