Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

आखातात युद्ध पेटले असताना “अरिदमन” आण्विक पाणबुडी भारताच्या नौदलात दाखल; भारताचे शांतपणे शक्तिवर्धन!!

आखातात युद्ध पेटले असताना अरिदमन नावाची आण्विक पाणबुडी आज भारताने आपल्या नौदलात दाखल करून घेतली.

नाशिक : आखातात युद्ध पेटले असताना अरिदमन नावाची आण्विक पाणबुडी आज भारताने आपल्या नौदलात दाखल करून घेतली. यातून भारताने अत्यंत शांतपणे स्वतःचे शक्तिवर्धन केले. संपूर्ण भारतीय बनावटीची अरिदमन नावाची आण्विक पाणबुडी भारताच्या नौदलात दाखल झाल्याने भारताच्या नौदलाची मारक क्षमता प्रचंड वाढली आहे.

अरिदमन या नावाचा अर्थ शत्रूचे दमन करणारे म्हणजेच शत्रूला पराभूत करणारे शस्त्र!! या अर्थाने अरिदमन नावाची पाणबुडी पाकिस्तानला आणि चीनला धडकीच भरवणारी आहे. कारण तिच्यात आंतरखंडीय आण्विक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. तिचा वेग आणि मारक क्षमता सुद्धा प्रचंड आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आणि नौदल प्रमुख दिनेश त्रिवेदी यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम मध्ये विशेष समारंभात अरिदमन आण्विक पाणबुडी भारताच्या नौदलात दाखल करून घेण्यात आली.

पाकिस्तानचा विषयच मिटवला

एकीकडे आखातातले युद्ध सुरू असताना अमेरिका आणि युरोपीय देश त्यात गुंतत चाललेत. रशिया आणि चीन हे देश सुद्धा हळूहळू त्यात ओढले जात आहेत. पाकिस्तान त्यामध्ये मध्यस्थीच्या नावाखाली लुडबुड करतोय, पण त्या देशाला अफगाणिस्तान सारख्या देशातल्या तालिबानी राजवटीला तोंड देणे सुद्धा कठीण जाते आहे. अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीच्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या नाकात दम आणलाय. तरी देखील पाकिस्तानची फुरफुरी आणि खुमखुमी गेलेली नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा अब्बास यांनी भारताला दमबाजी करून पाहिली. पण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, “अरिदमन” म्हणजे फक्त शब्द नाही, तर शक्ती आम्ही बोलून नाहीतर करून दाखवितो, अशा थोडक्या शब्दांमध्ये पाकिस्तानच्या दमबाजीला प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचा विषय मिटवून टाकला.

अरिदमन तिसरी पाणबुडी

अरिदमन ही भारताच्या नौदलात दाखल झालेली तिसरी आण्विक पाणबुडी आहे. या आधी अरिहंत १ आणि २ या आण्विक पाणबुड्या भारताच्या नौदलात दाखल आहेतच. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये चौथी आण्विक पाणबुडी सुद्धा भारताच्या नौदलात दाखल होणार आहे.

Indian Navy’s Third Nuclear SSBN, INS Aridhaman

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment