Trending News

No trending news found.

Wednesday, 10 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!

INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.

नाशिक : INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी बोलवलेल्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या. पण दिल्लीत दाखल झाल्याबरोबर त्यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी जरी उद्या “इंडी” आघाडीच्या बैठकीत सामील होणार असल्या तरी केजरीवाल मात्र त्या बैठकीत सामील होणार नाहीत. आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर प्रादेशिक पक्षांना खात असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी तामिळनाडूचे उदाहरण दिले. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव होताच काँग्रेसने त्या पक्षाची साथ सोडून दिल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

उद्याच्या “इंडी” आघाडीच्या बैठकीला 23 पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून दिली. त्यामध्ये त्यांनी बैठकीच्या अजेंडा याविषयी माहिती दिली. पण सामील होणाऱ्या 23 पक्षांची नावे त्यांनी लिहिली नाहीत.

– या पक्षांची वजाबाकी

पण उद्याच्या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, अन्य डावे पक्ष, त्याचबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि आम आदमी पार्टी या तीन प्रमुख शक्ती सामील होणार नाहीत. त्यामुळे उद्याच्या “इंडी” आघाडीच्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर वजाबाकीचा धक्का बसलाय.

– ममता बॅनर्जींची बेरीज नगण्य

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी होती. पण त्या आघाडीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने लगेच मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या गोटात उडी मारली. दोन मंत्री पदे पदरात पडून घेतली. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते चिडले. त्यांनी “इंडी” आघाडी पासून लगेच फारकत घेऊन टाकली. त्यामुळे इंडी आघाडीतल्या 22 खासदारांची संख्या घटली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या चार खासदारांची संख्या घटली. आम आदमी पार्टीच्या खासदारांची संख्या घटली. उद्याच्या बैठकीत ममता बॅनर्जी सामील होणार असल्या तरी त्यांच्या तृणमूळ काँग्रेसचे 22 पैकी किती खासदार त्यांच्याबरोबर राहतील याविषयी दाट शंका आहे. त्यामुळे “इंडी” आघाडीत झालेली ममता बॅनर्जींची बेरीज ही नगण्य ठरलीय.

23 political parties have confirmed participation in the INDIA janbandhan meeting at Constitution Club, New Delhi

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment