Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Yavatmal : यवतमाळमध्ये उर्दू शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी ‘लष्करी’ गीतावर सादरीकरण, गुन्हा दाखल

यवतमाळ येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफुर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणावर आक्षेप घेत भाजपचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विशेष प्रतिनिधी

यवतमााळ : Yavatmal यवतमाळ येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफुर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणावर आक्षेप घेत भाजपचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.Yavatmal

‘ए मर्द ये मुजाहिद तेरी एल्गार क्या है’ असे या गाण्याचे नाव असून ते स्नेह संमेलनामध्ये गायले गेले तसेच त्यावर नृत्यही करण्यात आले, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते.Yavatmal



हे गाणे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीतांपैकी एक असल्याचे मानले जाते. हे प्रामुख्याने लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते. हफिज जालंधर यांनी हे गाणे लिहिले आहे. त्यांनीच पाकिस्तानचे राष्ट्रगीत देखील लिहिले आहे. या गाण्याची निर्मिती 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात झाली. पाकिस्तानमध्ये रेडियोवर हे गाणे लावले जायचे. ‘ए मर्द ये मुजाहिद’चा अर्थ ‘हे धर्मयोध्या’ असा होतो.

भारतासोबतच्या युद्धांमध्ये हे गाणे केवळ एक रचना नसून ते एक प्रभावी ‘मानसिक अस्त्र’ म्हणून वापरले गेल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. ‘रेडिओ पाकिस्तान’च्या संग्रहातील नोंदी आणि लष्करी तज्ज्ञांच्या मते, 1965 च्या संघर्षापासून ते 1999 चे कारगिल आणि 2019 च्या बालाकोट प्रकरणापर्यंत, जेव्हा जेव्हा दोन्ही देशांत तणाव वाढला, तेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रसिद्ध करून जनतेमध्ये युद्धाचा जोश निर्माण करण्यासाठी त्याचा एक ‘वॉर क्राय’ म्हणून वापर केला गेला.

‘द फ्रायडे टाइम्स’ सारख्या नियतकालिकांनीही या गाण्याच्या धोरणात्मक प्रभावावर शिक्कामोर्तब केले असून, आता या गाण्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला भविष्यात कोणते कायदेशीर वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

FIR Filed: Yavatmal School Performs to Pakistan Military Song at Gathering

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment