विशेष प्रतिनिधी
मुंबई : Weather alert महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.Weather alert
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली की, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.Weather alert
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.
तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather alert in Maharashtra; Hailstorm with gale forecast from April 20 to 22, CMO warns of caution
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध मोडून काढून महिलांना आरक्षण देण्याचा पण नरेंद्र मोदींचा दृढसंकल्प!!
- पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!
- Gold & Silver : 15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला; SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट
- Prakash Raj : प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर भगवान राम आणि रामायणाची खिल्ली उडवल्याचा आरोप



Post Your Comment