Trending News

No trending news found.

Saturday, 13 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!, हा प्रकार आज घडला

नाशिक : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!, हा प्रकार आज घडला.NCP

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम १० जून रोजी होणार होता, पण काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या रेकॉर्ड कार्यक्रमामुळे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. तो कार्यक्रम आज झाला. या कार्यक्रमामध्ये वक्त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या जुन्या विषयाला पुन्हा उकळी दिली. 2004 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी आली होती, पण ती घेतली नसल्याने राष्ट्रवादीला आजपर्यंत कधीच मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही, असे वक्तव्य सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी केले. शरद पवारांनी केलेल्या राजकीय चुकीवर त्यांनी आवर्जून बोट ठेवले. फक्त त्यांनी शरद पवारांचे थेट नाव घेतले नाही एवढेच!!

  • सुनील तटकरेंचे भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासूनच सत्तेवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 मध्येच मुख्यमंत्री पदाची संधी आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या बरोबर लढली पण काँग्रेस विरुद्ध बोलायची कुणाची हिंमत नव्हती. अजित पवारांनी धाडस दाखवून काँग्रेसकडून जास्त जागा मिळवून दाखविल्या होत्या. त्याचबरोबर आपलेच आमदार जास्त निवडून आले होते. त्याचवेळी आपण मुख्यमंत्री पद घ्यायला हवे होते. त्यावेळी जर आपण मुख्यमंत्री पद घेतले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या नंबरचे स्थान आजपर्यंत कधीच कोणाला हिरावून घेता आले नसते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.



  • छगन भुजबळांचे भाषण

काँग्रेस फुटली. त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले होते, आपण विधानसभा भंग करू. त्यामुळे सहा महिने आधीच विधानसभा भंग झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काम करायला फक्त सहा महिने मिळाले. तेच आणखी सहा महिने मिळाले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री तेव्हाच झाला असता. अजितदादा सुद्धा तसे म्हणाले होते, याची आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली.

  • पवारांच्या जखमेवर चोळले मीठ

पण राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या जुन्या विषयाला उकळी देऊन सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या दोघांनीही शरद पवार यांच्या राजकीय जखमेवर मीठ चोळले. कारण 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती. तिच्यात शरद पवारांचा शब्द अंतिम होता. शरद पवारांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर मात करून जर मुख्यमंत्रीपद खेचून आणले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री सुद्धा झाला असता. पण शरद पवारांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर मात करता आली नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद खेचून घेता आले नाही‌. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापर्यंत कधीच मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हा सगळा इतिहास सांगितला नाही पण तो न सांगताच त्यांनी पवारांच्या राजकीय जखमेवर मीठ चोळून घेतले.

The topic of the Chief Minister’s post resurfaces at the NCP’s anniversary event.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment