Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

‘मिसिंग लिंक’ आता ‘कनेक्टिंग लिंक’ : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अर्धा तास प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई – पुणे आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून, या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याला ‘मिसिंग लिंक’ म्हणण्यापेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून, यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अद्ययावत अग्निशामन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर दोन बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले.

विंड टनेल मॉडेलिंग

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याच प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच महामार्ग केबल-स्टेड पुलाची निर्मितीही करण्यात आली असून, 182 मीटर उंचीचा हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. या पुलाच्या डिझाइनसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला असून, विंड टनेल मॉडेलिंगच्या आधारे त्याची आखणी करण्यात आली आहे.

ही ‘मिसिंग लिंक’ इकोनॉमिक मल्टिप्लायर म्हणून पुढे येईल आणि यामुळे ₹70,000 कोटींपेक्षा अधिकची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होणार असून नागरिकांचा वेळ देखील वाचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

एमएसआरडीसीच्या टीमने व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून, ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही ‘मिसिंग लिंक’ आज आपल्याला उदघाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

The ‘missing link’ is now the ‘connecting link

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment