Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त दोन कार; केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा घेतला “संदेश”; पण विरोधकांकडून मात्र खिल्ली!!

पश्चिम आशियातल्या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि इंधन पुरवठ्यावर दुष्परिणाम झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशावासीयांना इंधन बचतीचा सल्ला दिला. तो त्यांनी आज स्वतःच अंमलात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राजधानी नवी दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या ताफ्यात फक्त दोनच गाड्या ठेवल्या. त्यांनी त्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला, पण अनावश्यक गाड्या कमी केल्या.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम आशियातल्या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि इंधन पुरवठ्यावर दुष्परिणाम झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशावासीयांना इंधन बचतीचा सल्ला दिला. तो त्यांनी आज स्वतःच अंमलात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राजधानी नवी दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या ताफ्यात फक्त दोनच गाड्या ठेवल्या. त्यांनी त्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला, पण अनावश्यक गाड्या कमी केल्या.Only two cars in PM Modi’s convoy; Union ministers also took the “message”; but the opposition ridiculed him!!

– मोदींच्या ताफ्यात दोनच गाड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कृतीतून इंधन बचतीचा संदेश दिला. तो त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी लगेच अंमलात आणला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कालच मेट्रो मधून प्रवास केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातल्या 50 % गाड्या कमी करण्याचे आदेश ताबडतोब दिले. राजनाथ सिंह यांनी सुद्धा तशाच प्रकारची कृती केली. नितीन गडकरी 14 आणि 15 मे या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांच्या मार्गांची पाहणी करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या ताफ्यात कमीत कमी गाड्या असाव्यात, असा आदेश नितीन गडकरी यांनी दिला. त्यांनी बस मधून प्रवास करण्याची तयारी सुद्धा दाखविली.



– महाराष्ट्रातील अंमलबजावणी

शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानापासून ते विमानतळापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना ताफ्यांमधल्या गाड्या कमी करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या आदेशाला दुजोरा दिला. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला खासगी युरोप दौरा रद्द केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १२ आमदारांचा जपानचा अभ्यास दौरा रद्द केला.

– फडणवीसांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले इंधन बचतीचे आवाहन विरोधकांनी सकारात्मकपणे घ्यावे. उगाच त्या आवाहनाची टिंगल टवाळी करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

Only two cars in PM Modi’s convoy; Union ministers also took the “message”; but the opposition ridiculed him!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment