
नाशिक : पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.Sunetra Pawar’s journey on a chartered plane; but Sharad Pawar’s advice to the Prime Minister, Chief Minister and other political leaders!!
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र मुंबई ते पुणे चार्टर्ड विमानाने प्रवास केला. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका टिपण्या सुरू झाल्या. पण शरद पवारांनी मात्र आज बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसकट बाकीच्या नेत्यांना बचतीचा सल्ला दिला. सुनेत्रा पवारांच्या चार्टर्ड विमानाच्या प्रवासाविषयी ते काही बोलले नाहीत.
– केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून अनुकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्यानंतर राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि बाकीच्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा त्यांचे अनुकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलेटवर विधिमंडळात पोहोचले होते. त्यांनी पुढचे सहा महिने सगळे शासकीय कार्यक्रम छोटे करायचा निर्णय देखील जाहीर केला. पण मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या बुलेटवर वर्षा गायकवाड यांनी पीयूसी संदर्भातला आक्षेप घेऊन इंधन बचतीच्या मुद्द्यावरून टीका केली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
पण याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ फासल्याचे उघडकीस आले. त्यांनी मुंबई ते पुणे असा कारने प्रवास न करता चार्टर्ड विमानाने प्रवास केल्याचे उघड झाले. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
– शरद पवारांचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उपदेश
पण आजच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे गांभीर्य नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या विषयी वापरलेली भाषा सुद्धा योग्य नव्हती, असा टोमणा शरद पवारांनी मारला. इंधन बचतीसाठी तात्पुरत्या ताफ्यात्या गाड्या कमी करून उपयोग नाही. त्या ताफ्यात एवढ्या गाड्या आल्यास कशा??, याचा विचार केला पाहिजे. ताब्यातल्या गाड्या नेहमीच कमी असल्या पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि इंधनपुरवठ्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्या बैठकीत त्यांनी स्वतः हजर राहावे, अशी मागणी केली.
– पण सुनेत्रा पवारांविषयी बोलणे टाळले
पण सुनेत्रा पवारांनी चार्टर्ड प्लेन मधून प्रवास केला याविषयी शरद पवारांनी त्यांना कुठलाही उपदेश केला नाही किंवा त्यांच्यावर टीका सुद्धा केली नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना टोमणा मारणाऱ्या शरद पवारांना आपल्याच सुनेने चार्टर्ड प्लेनने केलेला प्रवास दिसला नाही, पण मंत्र्यांच्या ताफ्यांमधल्या गाड्या मात्र त्यांना “मोजता” आल्या. पवार कुटुंबीयांचा दुटप्पी व्यवहार इथे सुद्धा समोर आला.
Sunetra Pawar’s journey on a chartered plane; but Sharad Pawar’s advice to the Prime Minister, Chief Minister and other political leaders!!
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही; CBI संचालक निवडीवर असहमती, पंतप्रधानांच्या घरी बैठक
- पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त दोन कार; केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा घेतला “संदेश”; पण विरोधकांकडून मात्र खिल्ली!!
- Eileen Wang : अमेरिकेची माजी महापौर चिनी गुप्तहेर निघाली:बेकायदेशीरपणे चीनसाठी काम केल्याची कबुली दिली
- राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!



Post Your Comment