Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ; पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सुनेत्रा पवारांचा सहभाग!!

एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.Sunetra Pawar participates in the district annual plan meeting in western Maharashtra along with the Chief Minister!!

रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य करून त्या विषयाच्या राजकीय आगीत तेल ओतले. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा साथ दिली. पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वादावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी कुठलेही भाष्य केले नाही.



 

सुनेत्रा पवार कालच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्या. त्यानंतर आज त्यांनी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या समावेश त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांच्या एकत्रित वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभाग घेतला. मात्र, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर कुठलेही भाष्य केले नाही. त्याचबरोबर पार्थ पवार आणि जय पवार यांनी सुद्धा त्या विषयावर कुठली चर्चा केलेली दिसली नाही.

Sunetra Pawar participates in the district annual plan meeting in western Maharashtra along with the Chief Minister!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment