Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातच पवारांच्या राष्ट्रवादीने टाकली नांगी; दोन खासदार असूनही नगरपरिषदांच्या निवडणुकीत उडाली दांडी!!

राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नांगी टाकली. एकेकाळी फक्त पवार आणि पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार असून सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने आत्मविश्वास गमावला. म्हणूनच दोन-तीन ठिकाणचा अपवाद वगळता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ शकली नाही.

 

नाशिक : राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नांगी टाकली. एकेकाळी फक्त पवार आणि पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार असून सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने आत्मविश्वास गमावला. म्हणूनच दोन-तीन ठिकाणचा अपवाद वगळता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ शकली नाही.Sharad Pawar’s NCP not interested in Pune district local elections

पुणे जिल्ह्यातील 14 नगरपालिकांपैकी फक्त तीन नगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुतारी चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिले. त्यातली बारामतीची निवडणूक तर पुढेच ढकलली गेली. सासवड आणि शिरूर मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना लढायला लावले. बाकी कुठेच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुतारी हे चिन्ह दिसेना.



 

– कमळ चिन्हाचा बोलबाला

त्या उलट भाजपच्या कमळ चिन्हाचा पुणे जिल्ह्यात बोलबाला असून 14 पैकी 14 नगरपालिकांमध्ये भाजपने कमळ चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले. त्याचबरोबर 9 नगरपालिकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे करून घड्याळ चिन्हाची लाज राखली.

– सुप्रिया सुळे + अमोल कोल्हे प्रचारातून “गायब”

14 नगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुरळक ठिकाणी तुतारी चिन्हावर नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन खासदार असून सुद्धा त्यांच्या पक्षात एक उभारी देऊ शकले नाहीत. आपापल्या गावांमध्ये सुद्धा त्यांना तुतारी चिन्हावर उमेदवार उभे करता आले नाहीत.

– युगेंद्र पवारांच्या लग्नात सुप्रिया सुळे मग्न

एकीकडे नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे कुठेही प्रचारात दिसल्या नाहीत. त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारच्या हळदी आणि लग्न समारंभात त्या रंगल्या होत्या. खासदार अमोल कोल्हे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. फक्त अजित पवार त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात आघाडीवर दिसले तर रोहित पवार जामखेड सोडायला तयार नसल्याचे दिसले.

त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवर सुद्धा गळपटून गेलेली दिसली. पवारांच्या पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर नांगी टाकली.

Sharad Pawar’s NCP not interested in Pune district local elections

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment