Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; सहयोग सोसायटीत पवार कुटुंब एकत्रित

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. Sharad Pawar

शरद पवार सहयोग सोसायटी येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. सुरक्षा रक्षकाच्या हाताला हात धरुन शरद पवार पुढे आले. त्यानंतर, अजित पवारांच्या प्रतिमेसमोर डोकं खाली करुन हात जोडले. आपल्या लाडक्या पुतण्याला काकांकडून श्रद्धांजली वाहताना संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. Sharad Pawar



दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी हीच सहयोग सोसायटी राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले होते. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक बदल झाले. यावेळी सहयोग सोसायटी, गोविंदबाग आणि मुंबईतील देवगिरी बंगला येथील घडामोडी अत्यंत वेगाने घडल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय

अजित पवारांचे निधन झाल्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. अस्थीविसर्जनाच्या दिवशी शरद पवार नीरा नदीच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून नदीतील दूषित पाण्याची माहिती घेतली होती. शरद पवार तसेच शरद पवार गटातील नेत्यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी आम्ही एनडीएसोबतच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. तसेच छगन भुजबळ यांनी तर थेट म्हटले होते की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल. यावरून देखील शरद पवारांनी आक्षेप घेत म्हटले होते की, राष्ट्रवादीबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

आता शरद पवार हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी सहयोग सोसायटीकडे जाण्यास निघाले आहेत. दोघांमध्ये काय चर्चा होते? विलीनीकरण होणार का? तसेच शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

कौटुंबिक भेट

तर दुसरीकडे ही कौटुंबिक भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कौटुंबिक भेट झाली नव्हती म्हणून आज पवार कुटुंब सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जमले असल्याचे समजते.

Sharad Pawar Meets Sunetra Pawar in Baramati Amid NCP Merger Buzz

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment