Trending News

No trending news found.

Saturday, 16 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Supreme Court : शिवसेना पक्षचिन्ह खटल्याची 30 जुलै रोजी सुनावणी; नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी सुनावले...

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Supreme Court शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी सुनावले…Supreme Court



ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून माध्यमांमध्ये कोर्टाच्या कामकाजावर व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाबाबत सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“तुम्ही कोर्टात घाई करता व बाहेर जाऊन कोर्ट निर्णय देत नाही अशी विधाने करता, हे खपवून घेतले जाणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी सुनावणी जुलैअखेरीस घ्यावी व कुणालाही अशी बेजबाबदार वक्तव्ये करता येणार नाहीत, अशी मागणी केली. त्यानुसार ३० जुलैची तारीख निश्चित झाली.

Shiv Sena Symbol Case Scheduled for July 30; SC Rebukes Thackeray Faction

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment