Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Rupali Thombre : रूपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप- रूपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, अशोक खरातच्या विकृतीचा नवा व्हिडिओ

अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rupali Thombre  अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.Rupali Thombre

रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदानंतर आता चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे.Rupali Thombre



मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले?

रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे:

1) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

2) दि.29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.



3) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून मत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.

अशोक खरातने अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करायला लावला

रुपाली ठोंबरे पाटील यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अशोक खरात एका अल्पवयीन मुलीला उपचाराच्या नावाखाली टी-शर्ट वर करायला लावल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करत असताना या अल्पवयीन मुलीची आई देखील तिथेच उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अशोक खरात त्याच्या केबिनमध्ये बसलेला असताना एका अल्पवयीन मुलीला टीशर्ट वर करायला लावतो. त्यानंतर तिच्या पोटाला इंटरनेट केबल टूल आणि केबल टेस्टर सारख्या उपकरणाने स्पर्श करतो. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.

Rupali Thombre Accuses Rupali Chakankar of Masterminding Sex Racket VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment