Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!

राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!!, ही राजकीय विसंगती आज समोर आली. राहुल गांधींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला ठोकून काढले, तर सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला.

नाशिक : राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!!, ही राजकीय विसंगती आज समोर आली. राहुल गांधींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला ठोकून काढले, तर सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. Rahul Gandhi

– राहुल गांधींचे ममतांवर टीकास्त्र

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यात आज मतदान होत असताना राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ जारी करून ममता बॅनर्जी यांच्या आर्मी फूटपाड्या कारभाराला ठोकून काढले. काँग्रेस आणि भाजप यांच्यात विचारधारांची लढाई सुरू आहे. भाजप एक देश एक धर्म एक भाषा अशी घोषणा देतो पण काँग्रेस पक्ष मात्र राज्यघटनेचे रक्षण करतो. सर्व धर्मांना, सर्व भाषांना समान मानतो. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान ही काँग्रेसची भूमिका आहे. मी पश्चिम बंगालमध्ये जर ममता बॅनर्जी यांनी चांगला कारभार केला असता त्यांनी राज्यामध्ये धार्मिक फूट पडू दिली नसती, तर तिथे भाजपला शिरकाव करायची संधीच मिळाली नसती. पण ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये धार्मिक ध्रुवीकरण केले त्यामुळे भाजपला त्या राज्यात शिरकाव करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन काँग्रेसचे सरकार बनवावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.



– सुप्रिया सुळे यांचा ममतांना पाठिंबा

त्या उलट खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. ममता बॅनर्जी ज्याप्रकारे भाजपशी लढत आहेत, ते पाहता पश्चिम बंगाल मध्ये त्यांचेच सरकार पुन्हा येईल, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. पण त्याचवेळी सावध भूमिका घेऊन त्यांनी केरळ‌ आणि आसाम मध्ये काँग्रेसची सरकारे येण्याचा दावा सुद्धा केला.

– सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे

राहुल गांधींनी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पांडेचरी या राज्यांचा दौरा करून तिथे जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. त्या उलट सुप्रिया सुळे यांनी बारामतीत फक्त सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेत सहभाग नोंदविला. सुप्रिया सुळे बंगाल, आसाम किंवा तामिळनाडू या राज्यांमध्ये फिरकल्या देखील नाहीत. तरीदेखील त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि केरळ तसेच आसाम मध्ये काँग्रेस सत्तेवर येतील, असा दावा ठोकला. याबाबतीत त्यांनी राहुल गांधींच्या ऐवजी उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकले. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुंबईत बसून ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठिंबा जाहीर केला, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी बारामतीत मतदान केल्यानंतर ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अशा दोन वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विजयाचे दावे केले.

Rahul Gandhi attacks Mamata Banerjee but Supriya Sule supports Mamata

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment