Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

राघव चढ्ढा, हरभजन सिंग यांच्यासह ७ राज्यसभा खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली; काँग्रेस आनंदी झाली!!

राज्यसभेच्या ७ खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली, काँग्रेस आनंदी झाली!!, ही राजकीय घडामोड पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडली.

नाशिक : राज्यसभेच्या ७ खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली, काँग्रेस आनंदी झाली!!, ही राजकीय घडामोड पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडली.

– ७ खासदारांनी फोडली आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टीमध्ये अस्वस्थ असलेले खासदार राघव चढ्ढा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टी फुटल्याही घोषणा केली. आपल्याबरोबरच राज्यसभेचे ७ खासदार आम आदमी पार्टीतून बाहेर पडून भाजपमध्ये सहभागी होती, असे त्यांनी जाहीर केले. त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेटपटू हरभजन सिंग, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांचा समावेश आहे. मै उनकी दोस्ती के काबिल नही था क्यूकी मै शामिल नही हुआ!!, असा शायरी अंदाजात राघव चढ्ढा यांनी आम आदमी पार्टी फुटल्याची घोषणा केली. आम्ही आम आदमी पार्टीसाठी रक्त आणि घाम गाळला पण पक्षाच्या नेत्यांनी आमच्याविरुद्ध षडयंत्र करून प्रचार केला. आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केले. त्याचा परिणाम म्हणूनच आम्ही पक्ष सोडला, असा आरोप राघव चढ्ढा यांनी केला.

– आम आदमी पार्टीची आदळआपट

त्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन भरपूर आदळआपट केली. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांना पंजाबच्या जनतेने अत्यंत विश्वासाने राज्यसभेत पाठविले होते. पण पंजाबच्या जनतेचा विश्वासघात करून हे खासदार भाजपमध्ये निघून गेले. मोदी आणि शाह यांचे फुटीरतावादी राजकारण त्यासाठी कारणीभूत ठरले. पंजाबची जनता फुटलेल्या ७ खासदारांची नावे निश्चित लक्षात ठेवेल, अशी आदळआपट संजय सिंग यांनी केली.

– काँग्रेसला आनंद

आम आदमी पार्टीच्या दोन गटांमध्ये जुंपलेल्या या भांडणाचा काँग्रेसने मात्र आनंद लुटला. आम आदमी पार्टी आपल्याच खासदारांना पक्षात टिकवून ठेवू शकली नाही. पण आम्हाला हे आधीच माहिती होते. आम आदमी पार्टी भाजपची बी टीम असल्याचे आम्ही आधीच सांगत होतो. आज प्रत्यक्षात त्याचे प्रत्यंतर आले असा टोमणा दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी हाणला.

– प्रादेशिक पक्षांना मोठा दणका

पश्चिम बंगाल मधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदान झाल्यानंतर दिल्ली आणि पंजाब मध्ये ही महत्त्वपूर्ण घडामोड घडून आली. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शक्यता दिसून येताच आम आदमी पार्टी सुद्धा फुटली. त्यामुळे पश्चिम बंगाल दिल्ली आणि पंजाब मध्ये एकदम भाजपला मोठी political space उपलब्ध झाली. त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा आनंदाची उकळी फुटली. कारण दिल्ली आणि पंजाब मध्ये काँग्रेसचा पराभव करूनच आम आदमी पार्टी सत्तेवर आली होती, तर पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा आणि कम्युनिस्टांचा पराभव करूनच ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या होत्या. आता आम आदमी पार्टी आणि तृणमूळ काँग्रेस या दोन्ही प्रादेशिक पक्षांना धक्का बसल्याने भाजपचा राजकीय झाला असला तरी काँग्रेसला दीर्घकालीन राजकारणात लाभ होण्याचा शक्यतेने आनंद झाला.

Raghav Chadha MPs of AAP in Rajya Sabha announce merging with the BJP.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment