Trending News

No trending news found.

Saturday, 13 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारताचा गजर; न्यूनगंडी “विकासनशील” संकल्पना इतिहासजमा!!

नीती आयोगाच्या आजच्या बैठकीत विकसित भारताचा गजर करण्यात आला. विकासित भारताची संकल्पना राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला. नीती आयोगाच्या बैठकीत "विकसनशील" ही संकल्पनाच लोप पावली. "विकसनशील" संकल्पनेच्या ऐवजी विकसित भारत या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यातून विकसित जगात भारताचे एक पाऊल दमदारपणे पुढे पडले. विकसनशील ही संकल्पना इतिहासजमा झाली.

नाशिक : नीती आयोगाच्या आजच्या बैठकीत विकसित भारताचा गजर करण्यात आला. विकासित भारताची संकल्पना राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला. नीती आयोगाच्या बैठकीत “विकसनशील” ही संकल्पनाच लोप पावली. “विकसनशील” संकल्पनेच्या ऐवजी विकसित भारत या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यातून विकसित जगात भारताचे एक पाऊल दमदारपणे पुढे पडले. विकसनशील ही संकल्पना इतिहासजमा झाली.NITI Aayog meeting; the inferiority-laden concept of ‘developing nation’ consigned to history!

भारत स्वतंत्र झाल्यानंतर विकसनशील ही संकल्पना सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिली होती. देशातल्या सर्व राज्यकर्त्यांनी विकसनशील भारत ही संकल्पना सगळ्या भारतीयांच्या मनात रुजविली होती. भारताला विकासाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. इतर देश भारताच्या खूप पुढे गेलेत त्यांनी खूप विकास साधलाय, पण भारताला तसा विकास साधता आलेला नाही. भारताला विकसित राष्ट्रांच्या पंगतीत बसता येत नाही ही धारणा भारतीय राज्यकर्त्यांनी सर्व भारतीयांच्या मनामध्ये घट्ट बसवून ठेवली होती. त्यामुळे भारतीयांच्या मनात आपला देश विकसित नाही. तो विकसित व्हायला भरपूर वेळ लागेल. आपण विकसनशील देश आहोत, हा न्यूनगंड भरून राहिला होता. भारत केव्हा विकसित होणार??, याचा कुठलाही रोड मॅप भारतीय राज्यकर्ते सादर करू शकले नव्हते.



– “विकसनशील” शब्द इतिहासजमा

पण नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत, विशेषतः तिसऱ्या कारकिर्दीत “विकसनशील” या शब्दाला फाटा देऊन “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यामुळे विकसित भारताचे टार्गेट निश्चित झाले. “विकसनशील” हा शब्द इतिहास जमा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या (NITI Aayog) नियामक परिषदेची ११ वी बैठक झाली. ‘विकसित भारत @ २०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकास’ ही या वर्षीच्या बैठकीची संकल्पना होती. या बैठकीला २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासक उपस्थित होते. नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत सर्व २८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

– पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रेरणा

अनेक प्रमुख विकसित देशांच्या अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना भारताची विकासाची वाटचाल जगाला प्रेरणा देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाचा संकल्प अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर दिला आणि विशेषतः अक्षय ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब व अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. सहकारी संघराज्यवाद (cooperative federalism) अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळून काम केले पाहिजे. विकसित भारताचे हे स्वप्न प्रत्येक राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचा सामूहिक संकल्प बनला पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला.

– सर्व राज्यांचा निर्धार

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विकसित भारताची संकल्पना उचलून धरली. सर्वांनी ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व राज्यांनी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

NITI Aayog meeting; the inferiority-laden concept of ‘developing nation’ consigned to history!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment