Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक, देवेंद्र फडणवीसांची भेट; नंतर उमेदवारी जाहीर!!

एक दोन नव्हे, तर तब्बल ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मॅरेथॉन बैठक घ्यावी लागली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.

नाशिक : एक दोन नव्हे, तर तब्बल ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मॅरेथॉन बैठक घ्यावी लागली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.

– भाजपचे सहा उमेदवार जाहीर

महायुतीसाठी विधान परिषदेचे निवडणूक अत्यंत सोपी असताना आणि उमेदवारांची निवड करणे बिलकुलच अवघड नव्हते. त्यातच भाजपने स्वतःचे सहा उमेदवार जाहीर करून त्यात आघाडी घेतली होती. भाजपने सुरुवातीला 30 जणांची यादी पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविली होती पण पार्लमेंटरी बोर्डाने त्यातली निम्मी यादी कमी करून पाठवा असा निरोप पाठविल्यानंतर पंधरा नावे महाराष्ट्रातूनच कापली गेली उरलेल्या 15 नावांमधून भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने सहा नावे निश्चित करून त्यांची उमेदवारी जाहीर केली.

– सत्तालोलूप राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी

पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा आली असताना त्या जागेवरची उमेदवारी जाहीर करायला राष्ट्रवादीला भरपूर पापड लाटावे लागले. राष्ट्रवादी सारख्या कायम सत्तेला लालचावलेल्या पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. तब्बल 75 ते 80 जणांना विधान परिषदेचा आमदार होण्याची तहान लागली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव जागेवरचा उमेदवार जाहीर करताना बरीच दमछाक झाली.



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर काल रात्री मॅरेथॉन बैठका घ्याव्या लागल्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आली. त्यानंतर झिशान सिद्दिकी यांची उमेदवारी जाहीर करावी लागली. देवेंद्र फडणवीस यांची संमती मिळाल्याशिवाय ती उमेदवारी जाहीर करता आली नाही.

– नवाब मलिक यांच्या राजकीय कारकिर्दीत पाचर

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाचर मारून ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचे खऱ्या अर्थाने कधीच पुनर्वसन करत आले नाही. अजित पवारांनी नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करायचा डाव टाकून पाहिला, पण नवाब मलिक यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांची मुलगी सना मलिक विधानसभेवर निवडून आली तरी तिला नवाब मलिक यांची जागा घेता आली नाही.

– राष्ट्रवादीला पर्यायी मुस्लिम नेत्याची गरज

या पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसला एका मुस्लिम नेत्याची गरज होती. त्यासाठी झिशान मलिक हे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला उपयोगी वाटले म्हणून त्यांनी तब्बल 80 शिक्षकांच्या गर्दीतून त्यांचे नाव विधान परिषदेसाठी पक्के केले पण ते पक्के करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच धावपळ करावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती घ्यावी लागली. त्यानंतरच झिशान सिद्दिकी यांच्या गळ्यात राष्ट्रवादीची विधान परिषदेची उमेदवारी पडली. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांची संमती मिळाली नसती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला झिशान सिद्दिकी यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार निवडावा लागला असता.

NCP’s move to field Zeeshan Siddique as a candidate

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment