Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sunil Tatkare : अजितदादांचा पक्ष तटकरे, चाकणकरांमुळे बदनाम; या दोघांनाही गुन्हे दाखल करून अटक करा, शरद पवार गटाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.Sunil Tatkare

शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे यांनी हे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या कार्यालयाला मी आज ईमेल द्वारे हे निवेदन पाठवलेले आहे. त्यानुसार आपण तातडीने कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. अशोक खरात यांनी जे विविध गुन्हे केलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून ते एकट्याने केलेले नाहीत त्याची मोठी टीम त्याच्यासोबत होती. श्री शिव निका संस्थानच्या तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या विश्वस्त सदस्य होत्या.Sunil Tatkare



सुनील तटकरे रूपाली चाकणकर तसेच इतर सर्व विश्वस्त यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेळोवेळी अशोक खरातला मदत केल्याच्या कारणास्तव त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांना अटक करावी ही विनंती तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींना नम्र विनंती की आदरणीय अजितदादांचा NCP पक्ष तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्यामुळे बदनाम झाला आहे. अजित दादांनी कदाचित हे सहन केले नसते. अशोक खरातला त्यांनी राजकीय आधार देऊन पाठबळ दिलेले होते. त्यांना आपण अभय देऊ नये ही विनंती, असे लवांडे यांनी म्हटले आहे.

खाली वाचा शरद पवार गटाचे पत्र जशास तसे

विकास लवांडे आपल्या पत्रात म्हणतात, सिन्नर जिल्हा नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. मात्र अशोक खरात प्रमुख असलेल्या देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त असलेल्या रूपाली चाकणकर व इतर विश्वस्तांवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. अशोक खरात ही एक मोठी टोळी आहे. त्याची जी विविध प्रकरणे बाहेर येत आहेत, विविध गुन्हे दाखल होत आहेत हे सर्व कारनामे तो एकटा करू शकत नाही. अद्याप पर्यंत इतर कोणत्याही आरोपींवर गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यामुळे तपासावर संशय निर्माण होत आहे. आपण याप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही असा विश्वास दिलेला आहे.

मात्र रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग करून सुनील तटकरे यांच्या सहभाग व साह्याने अशोक खरात यांच्या सोबत विविध आर्थिक व महिला पुरुषांच्या शोषणाची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून अशोक खरात चे राजकीय पाठबळ देऊन हितसंबंध जोपासलेले आहेत. अशोक खरात यांनी जे विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत त्यात सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे तसे अनेक फोटो व्हिडिओ सार्वत्रिक उपलब्ध आहेत. ते एकमेकांना अनेक वर्षे वारंवार भेटलेले आहेत. त्या तिघांचे गेल्या काही वर्षातले सर्व सीडीआर तपासणी करणे आवश्यक आहे त्यांच्या भेटीगाठी, आर्थिक व्यवहार तपासणी आवश्यक आहे, त्यांची मागील पाच वर्षात वाढलेली बेसुमार मालमत्ता ही कशी वाढली? याचाही तपास केला पाहिजे.

अशोक खरातने केलेल्या सर्व गुन्हयात या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याची पाठराखण करून साथ दिलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहून महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी महिलांवर अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम जाणीवपूर्वक रूपाली चाकणकर यांनी केले आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला व सामाजिक स्वास्थ्याला लाजिरवाणे आहे.

तथापि अशोक खरात यांचेशिवाय सह आरोपी म्हणून सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर व इतर सर्व विश्वस्तांवर कामगार तसेच संस्थेचा चार्टर्ड अकाउंटंट यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे तशी आमची याद्वारे मागणी आहे.

पुरुषांना सुद्धा न्याय मिळणे आवश्यक

विकास लवांडे आपल्या पत्रात पुढे म्हणतात, अशोक खरात ही एक मोठी टोळी आहे त्यांच्यावर मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कारण इतके असंख्य गुन्हे करणे अशोक खरात एकट्याचे काम नाही त्याची मोठी टोळी आहे त्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल करून शेकडो अन्यायग्रस्त महिलांना व आर्थिक फसवणूक झालेल्या पुरुषांना सुद्धा न्याय मिळणे आवश्यक आहे. राज्यातील भोंदूगिरी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात आहे त्या सर्वांवर स्थानिक पोलिसांच्या मार्फत मोहीम राबवून राज्यात अंधश्रद्धा फैलावणाऱ्या भोंदूगिरीचे बुवाबाजीचे कायद्याने समूळ उच्चाटन करावे. या कामी आम्ही आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहोत. आपला महाराष्ट्र संत आणि समाज सुधारकांच्या विचारांचा आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा आहे हे आपण यानिमित्ताने दाखवून द्यावे सर्व दोषींवर कायद्याने कडक कारवाई व शिक्षा व्हावी ही विनंती, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

NCP (SP) Demands Arrest of Sunil Tatkare & Rupali Chakankar in Ashok Kharat Case

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment