Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

दोन राष्ट्रवादींच्या भांडणात अशोक खरात प्रकरणाची आग; पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक!!

दोन राष्ट्रवादींच्या भांडणात अशोक खरात प्रकरणाची आग; पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक!!, अशीच अवस्था महाराष्ट्रात दिसून आली.

नाशिक : दोन राष्ट्रवादींच्या भांडणात अशोक खरात प्रकरणाची आग; पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक!!, अशीच अवस्था महाराष्ट्रात दिसून आली. Ashok kharat

दोन्ही राष्ट्रवादींची भांडणे अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर लागली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची उणीदुणी काढली. पण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होऊ शकले नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा तुकडा मिळू शकला नाही.

पण त्यातच आता भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाची आग लागली आणि त्यात पवारांचे सगळे पुरोगामी संस्कार जळून खाक झाले. एरवी पवारांच्या पुरोगामी संस्काराचे ढोल ताशे वाजविणारेच भोंदू अशोक खरातच्या नादी लागल्याचे उघड्यावर आले आणि पवारांच्या पुरोगामी संस्कारांचे ढोल फुटले.

रुपाली चाकणकरांना गमवावी लागली पदे

अशोक खरातला गुरु मानून त्याचे पाय धुणाऱ्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागले. त्या मुद्द्यावरूनच दुसऱ्या पवार संस्कारित नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांचे वाभाडे काढले. कालपर्यंत रुपाली चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या मंत्री दत्ता भरणे यांचे सूर देखील बदलले.



अशोक खरात आणि माणिकराव कोकाटे

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पण अशोक खरातच्या प्रकरणात राजकीय हात धुवून घेतले. त्यांनी सुनील तटकरे यांचे प्रकरण बाहेर काढले. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून अशोक खरात याने सुनील तटकरे यांच्याकडे धोषा लावल्याचा दावा विकास लवांडे यांनी केला.

जयंत पाटील लागले अशोक खरातच्या नादी

विकास लवांडे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवारांचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जयंत पाटलांचा अशोक खरात याच्याबरोबरचा फोटो व्हायरल केला. अशोक खरातच्या नादी लागून जयंत पाटलांनी रक्ताची आंघोळ केल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक

या सगळ्याचा अर्थ हाच की पवारांनी आपल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर केलेले पुरोगामी संस्कार किती पोकळ होते, हेच सिद्ध झाले. कारण पवार आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सत्तेची उब देऊ शकले नाहीत. ते नेते आणि कार्यकर्ते भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागले. तो सांगेल तसे ते वागले. वास्तविक दोन्ही राष्ट्रवादींची भांडणे आधीपासूनच होती. पण त्याला अशोक खरात भोंदू प्रकरणाची आग लागली आणि त्यामध्ये पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक झाले.

NCP leaders involved in Ashok kharat case

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment