Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

TCS corporate Jihad : लैंगिक, भावनिक, मानसिक आणि धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या समोर; राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर!!

TCS corporate Jihad मधल्या लैंगिक, मानसिक धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणी सखोल चौकशी करून 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला.

  •  महिला सुरक्षेसंदर्भात 25 पेक्षा जास्त शिफारशी; आरोपींना कठोर आतल्या कठोर शिक्षेचीही शिफारस

नाशिक : TCS corporate Jihad मधल्या लैंगिक, मानसिक धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणी सखोल चौकशी करून 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार, संबंधितांवर कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला दिले.

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोध समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये बी. के. सिन्हा, मोनिका अरोरा आणि लीलावती या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने 18 आणि 19 एप्रिल रोजी नाशिक दौरा केला. समितीच्या सदस्यांनी पीडित महिला, पोलीस अधिकारी तसेच इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेच्या आधारे त्यांनी 50 हून अधिक पानांचा अहवाल तयार केला. यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षेतेबाबत 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. या अहवालात कार्यस्थळी महिलांची सुरक्षा, सन्मान, न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना नमूद करण्यात आल्या आहेत, असे महिला आयोगाचे अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी नमूद केले.

 पीडित महिलांच्या आयोगासमोर व्यथा

घरच्या अत्यंत बिकट परिस्थितीमुळे सहन करावा लागलेला त्रास पीडित तरुणीने राष्ट्रीय महिला आयोगाच्या समिती समोर मांडला. एका तरुणीने सांगितले की, तिचे वडील कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असून अंथरुणाला खिळले आहेत. त्यांच्या औषधोपचार आणि केमोथेरपीसाठी पैशांची तीव्र गरज असल्यानं कंपनीत सहन करावा लागणारा अपमान आणि मानसिक छळ ती मुकाट्याने सहन करत होती. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. तिने पुढे सांगितले की, वडिलांच्या उपचारांसाठी औषधांची गरज आणि घरातील उपासमारीची परिस्थिती यामुळं स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करावी लागली.

 तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी

दुसऱ्या एका तरुणीनेही आपली व्यथा मांडताना सांगितले की, तिचे वडील अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळले असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे. अनेकदा घरात अन्नाचा एक कणही नसायचा. अशा परिस्थितीत स्वाभिमानापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची ठरल्याने कंपनीतील वरिष्ठांकडून होणारा मानसिक त्रास सहन करत तिला काम सुरू ठेवावे लागले.

TCS कंपनीतले वातावरण अतिशय Toxic

मुख्य आरोपी दानिश, तौसिफ आणि रझा मेनन या तिघांनी TCS च्या नाशिक कार्यालयात वातावरण अतिशय विषारी Toxic करून ठेवले होते. त्यांनी धर्मांतराचे जाळेच निर्माण केले होते. त्यांना अश्विनी चैनानी पाठिशी घालत होती. त्यामुळे कुठलाही पुरुष अथवा महिला कर्मचारी या तिघांविरुद्ध साधा आवाजही उठवू शकत नव्हता. हे सगळे आरोपी कंपनीत येणार्‍या नव्या मुलींना टार्गेट करायचे. त्यांच्याशी गोड बोलून संबंध वाढवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे. नंतर त्यांना धर्मांतरापर्यंत खेचायचे.

TCS कंपनीत महिलांसाठी अजिबात सुरक्षित वातावरण नव्हते. तिथली कंपनी अंतर्गतची POSH समिती पूर्णपणे अकार्यक्षम ठरली. या समितीच्या सदस्यांना कंपनीतल्या महिलांच्या छळाचे बिलकुल गांभीर्य नव्हते. महिला कर्मचाऱ्यांनी काही तक्रारी करून सुद्धा कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती.



राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिफारशी

POSH कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपन्यांमध्ये POSH समित्या कार्यरत असल्यास पाहिजेत. जिथे त्या कार्यरत नसतील, त्या कंपन्यांवर सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करावी.

कंपन्यांमधील महिला सुरक्षितते संदर्भात सर्व प्रकारच्या कायद्यांची अंमलबजावणी, त्याची निगराणी नियमितपणे करण्यात यावी. त्यात हलगर्जी करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. POSH कायद्यातील 19 25 आणि 26 कलमांची अंमलबजावणी झालीच पाहिजे ती न करणाऱ्या कंपन्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी.

नाशिक TCS corporate Jihad मधील सर्व आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या 75 78 79 आणि 299 कलमांनुसार कठोर शिक्षा करावी. आरोपींनी पीडितांच्या फक्त धार्मिक भावनाच दुखावल्या नाहीत, तर त्यांचा लैंगिक मानसिक आणि धार्मिक छळ केलाय. त्यांना कलम 299 नुसार शिक्षा ठोठावलीच पाहिजे.

National Commission for Women report submitted to Chief Minister!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment