Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्या नाशिक दौऱ्यावर; TCS कॉर्पोरेट जिहाद संदर्भात पोलीस तपासाचा घेणार आढावा!!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे. महत्वाचे म्हणजे त्या TCS कॉर्पोरेट जिहाद संदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेणार असून त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची आधीच गंभीर दखल घेऊन एक तथ्य शोध समिती नाशिक मध्ये पाठविली होती. या समितीच्या सदस्यांनी कॉर्पोरेट जिहाद मधील पीडित महिला आणि पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन, त्याच बरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भातला अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर केला होता.



या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांची नाशिक भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्यांच्या या भेटीतून TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातल्या पीडितांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

या खेरीज विजयाताई रहाटकर उद्या दुपारी काळाराम मंदिरात ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सायंकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या गोदावरी महाआरतीच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत.

National Commission for Women Chairperson Vijaya Rahatkar to visit Nashik tomorrow.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment