
नाशिक : नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली. Nasrapur atrocity case; drove a wedge in Ajit Dada’s nationalist party over the post of Women’s Commission chairman!!
नसरापूर मध्ये 65 वर्षांच्या भीमराव कांबळेने अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या सीसीटीव्हीमुळे या हिणकस प्रकरणाचे गांभीर्य या सगळ्या महाराष्ट्र समोर आले. सगळ्या महाराष्ट्रात त्या नराधमाविरुद्ध प्रचंड संताप उसळला. पुण्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर आले त्यांनी त्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य ओळखते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायचा निर्णय घेतला.
#WATCH | Pune, Maharashtra: On the Pune rape and murder case, NCP-SP MLA Rohit Pawar says, "… The accused has been to jail twice, been released on bail twice, and the third time, he did this, torturing and killing this 3.5-year-old daughter. The law here needs to be changed… pic.twitter.com/fj18fMDadS
— ANI (@ANI) May 3, 2026
– चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद रिकामे
पण आमदार रोहित पवार यांनी मात्र नसरापूर अत्याचार प्रकरणात राज्य महिला आयोगाचे राजकारण घुसवले. खरात प्रकरणात नाव आल्याने रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर ते पण अजून रिकामे आहे. महायुती मधल्या सत्ता वाटपात ते पद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कुठल्या दुसऱ्या महिला नेत्याकडे जाऊच नये यासाठी रोहित पवारांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सुचवून अजितदादांच्या राष्ट्रवादीत पाचर मारून ठेवली. त्यासाठी त्यांनी नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजकीय आडोसा घेतला.
– रोहित पवारांचे राजकारण
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कुठलीही राजकीय व्यक्तीच नको. त्या ऐवजी निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, वर्षा देशपांडे, मनीषा गुप्ते किंवा मेधा गाडगीळ यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. पण अन्य नावांवर भर देताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्याही महिला नेत्याची तिथे नियुक्ती नको हेच रोहित पवारांनी अधोरेखित करून राजकारण साधले.
– विषयाला वेगळेच वळण देण्याचा “डाव”
नसरापूर अत्याचार प्रकरणात नराधमाला लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करून फाशीची शिक्षा करणे हा फडणवीस सरकारचा प्राधान्यक्रम आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची सुद्धा तशीच मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा विषयच ऐरणीवर नाही किंबहुना अध्यक्षपदाचा विषय आणि नसरापूरच्या अत्याचार प्रकरण हे एकमेकांशी जोडायचाही संबंध नाही तरीसुद्धा रोहित पवारांनी दोन राष्ट्रवादींमधल्या वादाचा विषय उकरून काढून नसरापूर अत्याचार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा विषय घुसवला. त्याचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली. त्यामुळे मूळ विषयाचे गांभीर्य जाऊन त्याला भलतेच वळण लागेल याचे भान सुद्धा रोहित पवारांनी राखले नाही
Nasrapur atrocity case; drove a wedge in Ajit Dada’s nationalist party over the post of Women’s Commission chairman!!
महत्वाच्या बातम्या
- सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- महालक्ष्मी सरसद्वारे उमेद अभियानाची गरुड भरारी; 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग!!
- Pawan Khera : सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना अग्रिम जामीन मंजूर केला; म्हटले – न सांगता भारत सोडू नका
- Oil companies : तेल कंपन्यांनी 2025-26 मध्ये दररोज ₹116 कोटी नफा कमावला; या काळात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर होते
- ‘मिसिंग लिंक’ आता ‘कनेक्टिंग लिंक’ : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा!!


Post Your Comment