Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Kumbh Udyog Sangam : कुंभ-उद्योग संगमात आज होणार 11 हजार कोटींचे 294 एमओयू; नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मुख्यमंत्री करणार घोषणा

जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Kumbh Udyog Sangam जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत.Kumbh Udyog Sangam

यातून आगामी 5 वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये एकूण 35 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. सिंहस्थ प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, उद्योग विभागाने हे उद्योग कायमस्वरूपी नाशिकमध्ये स्थिर व्हावेत, यासाठी या उपक्रमाचे आयोजन व प्रक्रियेची तयारी केली आहे.Kumbh Udyog Sangam



यापूर्वी 18 हजार कोटींचे करार

आजच्या समिटमध्ये 294 सामंजस्य करार करण्याची तयारी आहे. यापूर्वीही नाशिकमध्ये 18,000 कोटींची गुंतवणूक आली आहे. त्यातील कंपन्या जमिनी घेणे, बांधकामे सुरू करणे व विविध परवानग्या घेण्याच्या स्तरावर आहेत. याचे दृश्य परिणाम खऱ्या अर्थाने पुढील 3 ते 5 वर्षांत दिसून येतील. – दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

महिंद्रा करणार १२ हजार रोजगारांची निर्मिती

नाशिकमध्ये आधीच महिंद्राची मोठी गुंतवणूक आहेच; परंतु आता ईव्ही कारचाही प्लँट नाशिकमध्येच सुरू करण्यासाठी आडवण येथे 5,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच लॉजिस्टिक सपोर्टही सुरू केला जाईल. या दोन्हींमधून 10 ते 12 हजार रोजगार निर्माण होतील.

संरक्षण क्षेत्रात चार हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी बेर्निको वेगार्ड या जर्मन कंपनीशी कराराचे प्रयत्न

संरक्षण साहित्य उत्पादनात कार्यरत बेर्निको वेगार्ड या जर्मन कंपनीकडूनही नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात 1 हजार आणि टप्प्याटप्प्याने 3 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी गेली काही दिवस चाचपणी सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सामंजस्य करार करण्यासंदर्भात या कंपनी व प्रशासनाची चर्चा सुरू होती. नाशिकचे मुंबई आणि वाढवण बंदर यांच्यासोबत असलेले कमी अंतर, उत्तम हवामान, कुशल मनुष्यबळ, डिफेन्स हबमध्ये नाशिकचा समावेश यामुळे कंपनी ही गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.

सागरी सुरक्षा तंत्रज्ञानात कंपनी जागतिक स्तरावर अग्रेसर

बेर्निको वेगार्ड ही कंपनी हाय-स्पीड व्हिसल्स (वेगवान नौका), प्रगत प्रोपल्शन सिस्टिम्स आणि कमी वजनाच्या कंपोझिट इंजिनिअरिंग यामध्ये निष्णात आहे. सीमा सुरक्षा, सागरी देखरेख आणि संरक्षण दलांसाठी लागणारी प्रगत तांत्रिक साधने आणि मानवरहित स्वयंचलित यंत्रणा (ऑटोनॉमस सोल्युशन्स) तयार करण्यात या कंपनीचा मोठा वाटा आहे.

Kumbh Udyog Sangam: 294 MoUs Worth ₹11,000 Crore Signed in Nashik

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment